जमिन पीआर कार्ड

जमिनीचा पीआर कार्ड असताना सातबारा आधारे झाली रजिस्ट्री; जिल्हाधिकार्‍यांनी दिले चौकशीचे आदेश

Land PR Card: शहरातील शास्त्रीनगर भागातील एका भूखंडाच्या खरेदी विक्रीचे प्रकरण सध्या प्रशासनाची डोकेदुखी बनले आहे याप्रकरणी दस्त नोंदणी विभागाची यंत्रणाही संशयाच्या कक्षेत आली

जमिनीचा पीआर कार्ड असताना सातबारा आधारे झाली रजिस्ट्री; जिल्हाधिकार्‍यांनी दिले चौकशीचे आदेश

Land PR Card

हिंगोली (Land PR Card) : शहरातील शास्त्रीनगर भागातील एका भूखंडाच्या खरेदी विक्रीचे प्रकरण सध्या प्रशासनाची डोकेदुखी बनले आहे. याप्रकरणी दस्त नोंदणी विभागाची यंत्रणाही संशयाच्या कक्षेत आली असून जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
   
हिंगोली शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या भूखंड क्रमांक ७९ मधील ३० गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार सध्या प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे. १९६७ सङङङ खरेदी केलेल्या या जमिनीवर त्याच काळात प्लॉटिंग करण्यात आली होती. शासन नियमानुसार मंजूर झालेल्या या प्लॉट्स ची विक्री होऊन प्लॉटनिहाय मालमत्ता पत्रक पी आर कार्ड तयार होत गेले. परंतु सातबारावर याबाबत नोंदी झाल्या नाहीत. एकूण सहा एकर १६ गुंठे जमिनीतील शिल्लक तीस गुंठे जमीन प्रकरणी न्यायालयाने जमीन मालकाच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णया आधारे जमीन मालकाच्या वारसदारांनी ही जमीन मागील आठवड्यात विकली या व्यवहारात जमिनीची चतुर सीमा जी दाखविण्यात आली. तीच मुळात चुकीची असल्याचे शास्त्रीनगर भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे.

याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. वास्तविक दस्त नोंदणी विभागाच्या अधिकार्‍यांनी दक्षता न घेतल्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाला. ज्या मालमत्तेचे शहर भूमापन विभागाकडे मालमत्ता पत्रक तयार होते. ती मालमत्ता सातबारा वरून कमी करावयाची असते. शिवाय या व्यवहारात भरण्यात आलेला महसूलही कमी भरला गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश दिले असून, लवकरच यामागील सत्य बाहेर येईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

टैग्स: Land PR Card