कोलार राज्यस्तरीय ध्यानयोग शिबिर

कोलार येथील सत्संगाला राज्यस्तरीय ध्यानयोग तज्ज्ञ प्रा. स्वातीताई जाधव यांची हजेरी

Kolar Meditation Yoga Camp: तालुक्यातील कोलार येथील श्रीराम मंदिरात राज्यस्तरीय ध्यानयोग शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले...

कोलार येथील सत्संगाला राज्यस्तरीय ध्यानयोग तज्ज्ञ प्रा. स्वातीताई जाधव यांची हजेरी

Kolar Meditation Yoga Camp

ध्यानयोगातून शारीरिक व मानसिक आरोग्याचा संदेश
शेकडो साधकांचा सहभाग

मानोरा (Kolar Meditation Yoga Camp) : तालुक्यातील कोलार येथील श्रीराम मंदिरात राज्यस्तरीय ध्यानयोग शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या शिबिरात ध्यानयोगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि दैनंदिन जीवनात ध्यानसाधनेचा अवलंब कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 आजच्या धावपळीच्या जीवनात वाढता मानसिक ताण, चिंता आणि आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी ध्यानयोग उपयुक्त ठरतो. नियमित ध्यानसाधनेमुळे मन:शांती, एकाग्रता आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होते. तसेच निरोगी जीवनशैलीसाठी ध्यानयोगाचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमात विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ध्यानयोगाचे मार्गदर्शक प्रा. स्वातीताई जाधव (Prof. Swatitai Jadhav) आणि साधक उपस्थित होते. (Kolar Meditation Yoga Camp) उपस्थितांना ध्यानयोगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले. ध्यानयोगाच्या माध्यमातून समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरविंद इंगोले पाटील, सत्संग चार्या  गुरुदेव जिजकार काका, रामरावजी पाटील, ध्यान योगक अनिरुद्ध पिंपळे,  ठाकरे सर, भास्कडे सर, मिटकरी सर, डॉ अविनाश लोथे, चंद्रशेखर भड, गणेश जोशी, सावकार नेमाने, श्याम खोड, सुभाष पाटील, पंकज ठाकरे इत्यादीसह सत्संग मंडळींची उपस्थिती होती. याप्रसंगी मान्यवरांनी ध्यानयोगाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी नियमित ध्यानसाधना करून निरोगी आणि आनंदी जीवन जगावे, असे आवाहन केले. (Kolar Meditation Yoga Camp) कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.