औंढा नागनाथ (Kathoda Jalsamadhi Protest) : तालुक्यातील काठोडा येथील वनविभागाच्या असलेल्या पाझर तलावाच्या खालच्या ठिकाणी असलेल्या वन्यप्राणी पक्षी तसेच गुरेढोरे यांना पाणी पिण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पानवटयामध्ये पाईप व मोटारी टाकुन पाणी उपसा करीत असणा-या इसमाविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यासंदर्भात काठोडा ग्रामस्थांनी पाझर तलावात मंगळवारी (ता.२७) रोजी सकाळी बारा वाजता पाच ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले आहे. या (Kathoda Jalsamadhi Protest) जलसमाधी आंदोलनात काशिनाथ मुंजाजी कबले, गणपत हौसाजी मोरे, सदाशिव गोमाजी मोरे ,विश्वनाथ मुंजाजी कबले, शैलेश यादव मोरे यांचा समावेश आहे.
दुष्काळी परिस्थितीचा विचार केला असता गावामध्ये तसेच गावाच्या सभोवताली पिण्याच्या पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे गावातील पाळीव गुरेढोरे, वन्यपशु प्राण्यांसाठी बनविलेल्या पानवटयामध्ये पाणी पिण्यासाठी येत आहेत. उक्त पाणवटा काठोडा येथिल वन विभागाच्या पाझर तलावच्या पायथ्याशी स्थित आहे. त्या पाणवट्याच्या शेजारी असलेले काहि शेतकरी त्या पाणवटयामधुन रात्रीदिवस पाणी उपसा करीता आहेत. ज्यामुळे तळ्यातील पाण्याची पातळी हि मृत जलसाठयाच्या पलीकडे गेली आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे जे पाणी एप्रिल मे महिण्यापर्यंत असायचे ते पाणी जर पाणवटयामधुन उपसा बंद नाही केला तर या महिण्याअखेर संपण्याची शक्यता आहे.
तात्काळ तलावाच्या खाली असलेल्या पाणवटयांमध्ये, खडडयांमध्ये असलेल्या मोटारी जप्त कराव्यात. मोटारी टाकणार्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जलसमाधी आंदोलना दरम्यान ग्रामस्थांनी केली. जर जलसमाधी आंदोलन (Kathoda Jalsamadhi Protest) करूनही कारवाई मोटारी पंप काढल्या नाही तर यापुढे मोठे आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत आंदोलन कर्त्यांनी औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे निवेदन दिले होते कारवाई होत नसल्याने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. पाझर तलावामध्ये काशीनाथ मुंजाजी कबले,शैलेश यादव मोरे,गणपत हौसाजी मोरे,सदाशिव गोमाजी मोरे,विश्वनाथ मुंजाजी कबले रा काठोडा या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले.
काठोडा जलसमाधी आंदोलन
काठोडा ग्रामस्थांचे पाझर तलावात जलसमाधी आंदोलन
Kathoda Jalsamadhi Protest: काठोडा येथील वनविभागाच्या असलेल्या पाझर तलावाच्या खालच्या ठिकाणी असलेल्या वन्यप्राणी पक्षी तसेच गुरेढोरे यांना पाणी पिण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पानवटयामध्ये पाईप...
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Kathoda Jalsamadhi Protest
टैग्स:
Kathoda Jalsamadhi Protest