कान्हेगाव शिवार चोरी  प्रकरण

‘दुष्काळात तेरावा महिना' कान्हेगाव शिवारातील ८ शेतकर्‍यांच्या मोटारी, वायर चोरी 

Kanhegaon Shivar Theft Case: सध्या शेतकरी कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे दुष्काळामुळे शेती हंगामाला मोठा फटका बसला आहे दुसरीकडे 'दुष्काळात तेरावा महिना ' म्हणीप्रमाणे एकाच वेळी कान्हेगाव शिवार

‘दुष्काळात तेरावा महिना' कान्हेगाव शिवारातील ८ शेतकर्‍यांच्या मोटारी, वायर चोरी 

Kanhegaon Shivar Theft Case

आखाडा बाळापूर (Kanhegaon Shivar Theft Case) : सध्या शेतकरी कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे दुष्काळामुळे शेती हंगामाला मोठा फटका बसला आहे दुसरीकडे 'दुष्काळात तेरावा महिना ' म्हणीप्रमाणे एकाच वेळी कान्हेगाव शिवारातील ८ शेतकर्‍यांच्या मोटारीचे हजारो रुपये किंमतीचे केबल चोरट्यांनी चोरून नेले आहे, याबाबत शेतकर्‍यांनी आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात धाव घेऊन तक्रार अर्ज दिला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कान्हेगाव शिवारात शेत सर्वे नंबर २० मध्ये शेती असलेल्या रामराव मारोतराव वाघमारे,तुकाराम मारोतराव वाघमारे, श्रीराम गणपत वाघमारे,दिपक केशवराव दुर्गे, सिद्धेश्वर दादाराव वाघमारे , प्रसाद रूद्राजी वाघमारे,माधव डिगांबर दुर्गे, शंकर भिमराव वाघमारे या शेतकर्‍यांनी शेती सिंचनासाठी कयाधू नदीवर मोटारी बसवल्या आहे २८आक्टोंबंर रात्री ९ ते २९ आक्टोबंर सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान (Kanhegaon Shivar Theft Case) अज्ञात चोरट्यांनी ७ शेतकर्‍यांच्या मोटारी शेकडो फुट वायर चोरी करून नेले याबाबत शेतकर्‍यांनी आज आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केला आहे.