कन्हान नगरपरिषद अतिक्रमण

शिवाजी नगरातील समाजभवन व खेळाच्या मैदानावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

Kanhan Municipal Council Encroachment: नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्रमांक ०८ मधील शिवाजी नगर परिसरातील समाज भवन आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असले ल्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवुन..

शिवाजी नगरातील समाजभवन व खेळाच्या मैदानावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी

Kanhan Municipal Encroachment

 

नागरिकांच्या हक्काची जागा मोकळी करण्या साठी नगरपरिषदेला निवेदन;
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

कन्हान (Kanhan Municipal Council Encroachment) : नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत प्रभाग क्रमांक ०८ मधील शिवाजी नगर परिसरातील समाज भवन आणि खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असले ल्या जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवुन ती जागा नागरिकांसाठी मोकळी करून द्यावी, अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणी संदर्भात नागरिकां नी मुख्याधिकारी आणि यांना निवेदन सादर केले असु न समस्येवर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

कन्हान येथे नगरपरिषदेची (Kanhan Municipal Encroachment) स्थापना होऊन १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र नगरपरिषद अस्तित्वात येण्या पूर्वी सुमारे २० वर्षांपूर्वी तत्कालीन ग्राम पंचाय तीने प्रभागातील हक्काच्या समाज भवनाच्या जागेवर आरोग्य उपकेंद्राची स्थापना केली होती. या ठिकाणा पासुन अवघ्या १५० ते २०० मीटर अंतरावर शासकीय प्राथमिक केंद्र कार्यरत असल्याने दुसऱ्या आरोग्य उप केंद्राचे स्थान, जागेचा नियोजित वापर आणि संबंधित नियमांची अंमलबजावणी याबाबत प्रशासनाने वस्तु स्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा आरोग्य उपकेंद्रासाठी लागु असलेल्या अंतरासंबंधीच्या नियमांचा मुद्दा ही या प्रकरणात महत्त्वाचा ठरत आहे. नियमानुसार प्राथमि क आरोग्य केंद्रापासुन ५०० मीटर दूर पाहिजे, असे बोलले जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने आरोग्य विभागाशी समन्वय साधुन या बाबीची स्पष्टता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुलांना खेळण्या साठी राखीव असलेल्या पटांगणावर अतिक्रमण करू न पक्के बांधकाम करण्यात आल्याचा आरोप निवेदना तुन करण्यात आला आहे.

परिणामी परिसरातील मुलां ना खेळण्यासाठी सुरक्षित आणि मोकळी जागा उपल ब्ध नसल्याची तक्रार नागरिकांकडुन व्यक्त होत आहे. तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्य क्रमांसाठी समाजभवनाची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. समाजभवन आणि खेळाचे मैदान या केवळ मोकळ्या जागा नसुन समाजा च्या सामुहिक गरजांशी निगडित सार्वजनिक सुविधा आहेत. विकास आराखड्यात सार्वजनिक उपयोगासा ठी राखीव असलेल्या जागांचा वापर नियोजना नुसार होणे आवश्यक आहे. अशा जागांचा मूळ उद्देश बदल ला गेला असल्यास किंवा अनधिकृत बांधकाम झाले असल्यास त्याची नियमानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. 

प्रभाग क्रमांक ०८ मधील समाजभवन व खेळा च्या मैदानासाठी राखीव असलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करावी, अधिकृत अभिलेखे व मंजुर विकास आराखडा तपासावा आणि अतिक्रमणाबाबत नियमा नुसार चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवा ई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आरोग्य उपकेंद्रासाठी पर्यायी शासकीय जागा उपलब्ध होऊ शकते का, याची व्यवहार्यता तपासावी. संबंधित आरोग्य सुविधा हलविण्याची आवश्यकता असल्यास नागरिकांच्या आरोग्यसेवेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेऊन आरोग्य विभागाच्या समन्वयातुन निर्णय घ्यावा.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून समाज भवनाची जागा आणि खेळाचे मैदान नागरिकांना त्यां च्या मूळ उद्देशानुसार उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या प्रश्नासंदर्भात नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक घोडके आणि नगरा ध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांना निवेदन देण्यात आले असुन त्याच्या प्रती राज्यमंत्री आशीष जयस्वाल, नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी, नागपुर यांना पाठविण्यात आल्या आहेत. मागण्यांची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातुन देण्यात आला आहे.

नगरपरिषद प्रशासनाने या (Kanhan Municipal Encroachment) प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नियमां च्या चौकटीत नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सार्वज निक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मुलांचे खेळाचे मैदान, समाजभवन आणि नागरिकांसाठी मोकळ्या जागा या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या मूलभुत गरजा आहेत. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ स्थानिक वाद म्हणुन न पाहता जनहिताच्या दृष्टीने पाहणे आव श्यक आहे. आता नगरपरिषद प्रशासन या मागणीची कितपत गांभीर्याने दखल घेते, आरक्षित जागेची प्रत्य क्ष पाहणी कधी करते आणि आरोग्य उपकेंद्राच्या स्था नासह अतिक्रमणाच्या प्रश्नावर कोणता निर्णय घेते, याकडे शिवाजी नगरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.