Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

कन्हान अतिक्रमण

कन्हान मुख्य रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमण तात्काळ हटवा

Kanhan Encroachment: मुख्य रस्त्यावरील पक्का फुटपाथ बांधण्या त आलेला असतानाही काही दुकानदारांकडुन साहित्य , बोर्ड तसेच बांधकाम साहित्य (वाळु, गिट्टी, विटा, दगड) फुटपाथ व रस्त्यावर ठेवण्यात


कन्हान मुख्य रस्त्यावरील फुटपाथ अतिक्रमण तात्काळ हटवा

Kanhan Encroachment |

 

ज्येष्ठ नागरिक संघाचा नगरपरिषदेला इशारा; ७ दिवसांची मुदत

कन्हान (Kanhan Encroachment) : मुख्य रस्त्यावरील पक्का फुटपाथ बांधण्या त आलेला असतानाही काही दुकानदारांकडुन साहित्य , बोर्ड तसेच बांधकाम साहित्य (वाळु, गिट्टी, विटा, दगड) फुटपाथ व रस्त्यावर ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अतिक्रमणामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरून जीव धोक्यात घालुन चालावे लागत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक संघ, कन्हान यांच्या वतीने कन्हान-पिपरी नगरपरिषदे च्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

फुटपाथ (Kanhan Encroachment) हा नागरिकांच्या सुरक्षित व मुक्त वापरासाठी अस लेला मूलभुत हक्क असल्याचे निवेदनात नमुद करण्या त आले आहे. निवेदनात महाराष्ट्र नगरपरिषद अधिनि यम १९६५ मधील कलम १६७, १६९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ अन्वये कारवा ईची मागणी करण्यात आली आहे. तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या १९ जून २०२६ रोजीच्या ' मनियार इलियाझ ’ प्रकरणातील आदेशाचा संदर्भ देत फुटपाथ मोकळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

अतिक्रमण तात्काळ हटवुन (Kanhan Encroachment) फुटपाथ नागरिकांसाठी खुला करावा, अन्यथा ७ दिवसांनंतर उपविभागिय अधिकारी रामटेक तसेच उच्च न्यायालय, नागपुर खंडपीठ येथे  याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ नागरिक संघाने दिला आहे. निवेदनावर संघाचे सचिव प्रकाश नाईक यांची स्वाक्षरी असुन अध्यक्ष पी. डी. जयस्वाल, उपाध्यक्ष नारायण गजभिये सदस्य दामोदर बंड, रमेश चव्हाण, छगन वानखेडे, केशव चौधरी, रफिक शेख, बालाजी नायर, किशोरी अरोरा व महेंद्र चव्हाण आदी सदस्यांनी मागणी केली आहे.