Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कळमनुरी शॉपिंग  कॉम्प्लेक्स

कळमनुरीच्या शॉपिंग  कॉम्प्लेक्सला ला कै. विठ्ठलराव नाईक यांचे नाव द्या..

Kalamnuri Shopping Complex:


कळमनुरीच्या शॉपिंग  कॉम्प्लेक्सला ला कै विठ्ठलराव नाईक यांचे नाव द्या

Kalamnuri Shopping Complex |

 

१७ सप्टेंबरपूर्वी नामकरण न केल्यास नागरिकांकडून फलक लावण्याचा इशारा

कळमनुरी (Kalamnuri Shopping Complex) : कळमनुरी शहरातील नवीन बसस्थानकाजवळ व लमानदेव मंदिरासमोरील नगरपरिषदेच्या शॉपिंग सेंटरला स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार कै. कॉ. विठ्ठलरावजी नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कै. कॉ. विठ्ठलरावजी नाईक यांनी निजामी राजवटीविरुद्ध लढा देत मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिले. तसेच (Kalamnuri Shopping Complex) कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा नेतृत्व करत गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कार्य केले. त्यांच्या प्रयत्नातून संबंधित जागेवरील अतिक्रमणे हटवून तेथे सामाजिक सभागृह उभारण्यात आले होते.

कालांतराने हे सामाजिक सभागृह जमीनदोस्त झाले असून, त्याच जागेवर नगरपरिषदेच्या माध्यमातून नवीन शॉपिंग सेंटरचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या संकुलाला “स्वातंत्र्यसैनिक मा. आमदार कै. कॉ. विठ्ठलरावजी नाईक व्यापारी संकुल” असे नाव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात राज्यसभेचे खासदार डॉ. रामराव वडकुते यांनी १५ जुलै २०२६ रोजी, तर आमदार संतोषराव बांगर यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी नगरपरिषद प्रशासनाला पत्र देऊन नामकरणाची मागणी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या मागणीवर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन १७ सप्टेंबरपूर्वी सदर व्यापारी संकुलाला कै. विठ्ठलराव नाईक यांचे नाव देऊन अधिकृत नामफलक (Kalamnuri Shopping Complex) लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा १७ सप्टेंबर रोजी नागरिकांच्या वतीने सदर इमारतीवर “कै. कॉ. विठ्ठलराव नाईक व्यापारी संकुल” असा नामफलक लावण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत आमदार संतोषराव बांगर यांनाही देण्यात आली आहे. या निवेदनावर विश्वनाथ गाडेकर, अजय चव्हाण, शिवम नाईक, रुपेश सोनी, पांडुरंग खुडे, इंद्रजीत मस्के, शिवाजी बेंद्रे, अनिल मस्के, भारत क्षीरसागर, साहेबराव इंगळे, पुंजाराम वाघमारे, शेख गफूर, चंपतराव मस्के, आधीचे स्वाक्षऱ्या आहे