कळमनुरी हत्याकांड प्रकरण

खरवड शिवारात विवाहितेची हत्या; सासू गंभीर जखमी

Kalamnuri Murder Case: कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात कौटुंबिक वादातून २४ वर्षीय विवाहितेची हत्या झाल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेत विवाहितेची सासू गंभीर जखमी झाली.

खरवड शिवारात विवाहितेची हत्या; सासू गंभीर जखमी

Kalamnuri Murder Case

 

पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

कळमनुरी (Kalamnuri Murder Case) : तालुक्यातील खरवड शिवारात कौटुंबिक वादातून २४ वर्षीय विवाहितेची हत्या झाल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेत विवाहितेची सासू गंभीर जखमी झाली. दरम्यान, या घटनेनंतर काही अंतरावर पती विशाल संतोष डोंगरे यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. या दुहेरी घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दिपाली विशाल डोंगरे (वय २४, रा. धानोरा ज.) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली माहेरी का आली, या (Kalamnuri Murder Case) कारणावरून पती विशाल याच्या मनात राग होता. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास खरवड शिवारातील शेतातील घराजवळ विशाल याने जुन्या बाजेच्या लाकडी दांड्याने दिपालीच्या डोक्यावर, पोटावर व तोंडावर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने दिपालीचा मृत्यू झाला.

यावेळी कमलबाई प्रभाकर पाईकराव यांनाही विशाल याने लाकडी दांड्याने डोक्यावर, दोन्ही हातांवर व चेहऱ्यावर मारहाण केली. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९ व ११८(२) अंतर्गत विशाल डोंगरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 या (Kalamnuri Murder Case) घटनेनंतर विशाल डोंगरे याने घटनास्थळापासून काही अंतरावर गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर रसाळ यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी एन. एस. देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

टैग्स: Kalamnuri Murder Case