Kalamnuri Drunk Driver Case: कळमनुरी बस आगारात कर्तव्यावर दारू पिऊन आलेल्या चालकावर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी/ हिंगोली (Kalamnuri Drunk Driver Case) : कळमनुरी बस आगारात कर्तव्यावर दारू पिऊन आलेल्या चालकावर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विश्राम गृह, आगार कळमनुरी येथे आरोपी रमेश भागोराव टाळीकुटे व्यवसाय - चालक, आगार कळमनुरी हा दारू पिऊन आला होता. त्याच्या तोंडाचा आंबट उग्रट वास येत असल्याने संशय आला.
याबाबत आगार व्यवस्थापक लिंबाजी काशिनाथ होळकर, रा. परभणी आगार कळमनुरी यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी पत्र देऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, डॉक्टरांनी तो दारूच्या अंमलाखाली असल्याचा लेखी अहवाल दिला. त्यावरून पोलीस ठाणे कळमनुरी येथे (Kalamnuri Drunk Driver Case) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोले हे करीत आहेत. आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.