Job Fraud

नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १३ लाखांची फसवणूक; उदगीर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

उदगीरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १३ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंट प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी १३ लाखांची फसवणूक; उदगीर शहर पोलिसांत गुन्हा दाखल

ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंटच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

उदगीर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंटच्या माध्यमातून फिर्यादीसह इतरांची तब्बल १ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रतीक्षा ज्ञानेश्वर राजुरे (वय २९, रा. रामरक्षा निवास, नई आबादी, उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उत्तर प्रदेश आणि छत्रपती संभाजीनगरमधील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभय प्रताप शर्मा (रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश), दशरथ विठ्ठल जाधव (रा. शिक्षक कॉलनी, शिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि सचिन शिवराम धमाले (रा. वडगाव कोल्हाटी, बाळापूर परिसर, छत्रपती संभाजीनगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ ऑगस्ट २०२५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादी व इतर साक्षीदारांना ग्रॅव्हिटी प्लेसमेंट अँड मॅनेजमेंटच्या माध्यमातून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविल्याचा आरोप आहे. या आमिषातून संबंधितांची एकूण एक कोटी १३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.०९ वाजता उदगीर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३३८, ३३६(३), ३४०(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक ४११/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेडेकर करीत आहेत.

संबंधित सामग्री

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुगावच्या कमलाकर शिंदे यांचे निलंग्यातून अपहरण

लातूर बँक निवडणुकीदरम्यान कमलाकर शिंदे बेपत्ता; मुलगी सृष्टी यांचा अरविंद पाटलांवर अपहरणाचा गंभीर आरोप.

Nov 09, 2026
 पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पुण्यातील विमाननगरमध्ये पबमधील वादातून तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक.<br/>

Nov 09, 2026
लातूरमध्ये प्रॉपर्टीसाठी बापानेच संपवलं पोटच्या मुलाचं आयुष्य

लातूरमध्ये प्रॉपर्टीसाठी बापानेच संपवलं पोटच्या मुलाचं आयुष्य

लातूरमध्ये प्रॉपर्टीच्या वादातून सात वर्षीय अरमानची हत्या केल्याचा आरोप. याप्रकरणी ५८ वर्षीय वडिलांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

Nov 09, 2026
मुंब्र्यात नवजात बाळांच्या विक्रीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड! ११ आरोपी अटकेत; एका बाळाची ७ लाखांना विक्री

मुंब्र्यात नवजात बाळांच्या विक्रीचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड! ११ आरोपी अटकेत; एका बाळाची ७ लाखांना विक्री

मुंब्र्यात नवजात बाळांच्या विक्रीचं रॅकेट उघड! ११ आरोपी अटकेत; एका बाळाचा ७ लाखांना सौदा झाल्याचा धक्कादायक खुलासा.

Nov 07, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये सैराट! बहिणीच्या प्रेमसंबंधातून भावाने केला तरुणाचा खून

त्र्यंबकेश्वरमध्ये सैराट! बहिणीच्या प्रेमसंबंधातून भावाने केला तरुणाचा खून

नाशिकच्या सापगावमध्ये बहिणीच्या प्रेमसंबंधातून १८ वर्षीय आर्यन कांबळेची हत्या. चाकूने हल्ला केल्याप्रकरणी आदित्य मोंढेला अटक.

Nov 07, 2026