Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जवळा बाजार अन्नधान्य किराणा किट

पितृपक्ष निमित्ताने सात निराधार आजींना जीवनावश्यक अन्नधान्य किराणा किटचे वाटप

Javala Bazar Grains Grocery kit: औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरातील विविध गावांमधील सात निराधार वयोवृद्ध आजींना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक किराणा साहित्य किटचे वाटप


पितृपक्ष निमित्ताने सात निराधार आजींना जीवनावश्यक अन्नधान्य किराणा किटचे वाटप

Javala Bazar Grains Grocery kit |

जवळा बाजार (Javala Bazar Grains Grocery kit) : पितृपक्ष पंधरवाड्या निमित्त प्रियजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदानाला सामाजिक सेवेची जोड देत होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटिज (एच.ए.आर.सी.)च्या वतीने हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार परिसरातील विविध गावांमधील सात निराधार वयोवृद्ध आजींना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक किराणा साहित्य किटचे वाटप गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

जवळा बाजार येथील दुर्गा हॉस्पिटलमध्ये आयोजित या उपक्रमात गरजू वयोवृद्ध महिलांना जीवनावश्यक अन्नधान्य व किराणा साहित्याचा आधार देण्यात आला. यावेळी एच.ए.आर.सी.चे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, डॉ. दिनेश भुतडा, डॉ. राजकुमार भारुका, डॉ. बालाजी खरबळ, प्रकाश डुबे, व्हि. टी. शिंदे, संजयजी लाहोटी, सुरेश नाईकवाडे, रावसाहेब अंभोरे, बालाजी नागरे, माधव डुबे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

पितृपक्षानिमित्त परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 25 निराधार वयोवृद्ध आजींना महिनाभर पुरेल असे किराणा साहित्य किट देण्याचा उपक्रम एच.ए.आर.सी.ने हाती घेतला आहे. या उपक्रमासाठी लाभार्थी निवडताना अत्यंत गरजू व निराधार वयोवृद्ध महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. मुलगा किंवा सून नसलेली व एकटी राहणारी, स्वतःचे घर किंवा शेती नसलेली, पेन्शन अथवा नियमित उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेली, वयामुळे रोजमजुरी करणे शक्य नसलेली तसेच अन्नधान्य व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी इतरांच्या मदतीवर अवलंबून असलेल्या आजींची निवड करण्यात आली. लाभार्थी निवडीसाठी तांदळे यांनी सहकार्य केले. 

प्रत्येक किटमध्ये गहू, तांदूळ, तूरडाळ, चनाडाळ, मसूरडाळ, मूगडाळ, साखर, सोयाबीन तेल, चहा, रवा, मैदा, पोहे, मुरमुरा, मीठ, शेंगदाणे, साबुदाणा, हळद, मिरची, मोहरी, जिरे, चटपट मसाला तसेच व्हील साबण, लाईफबॉय साबण, काडीपुडा आदी दैनंदिन वापराच्या जीवनावश्यक साहित्याचा समावेश आहे.

या (Javala Bazar Grains Grocery kit) उपक्रमाला लोकसहभागातून आर्थिक सहकार्य मिळाले. विश्वास लव्हेकर, विजय औंढेकर, विजय पेडलवार, हार्दिक ठाकर, राजकुमार लाहोटी, आलोक जोशी, डॉ. दिनेश भुतडा, ओम सोनी, विनोद भाला, सौ. मीनल बालगरकाशी, तारा बाहेती, संदीप भंडे आणि बद्रीविशाल सोनी यांनी आर्थिक सहयोग देत सेवाकार्यात सहभाग नोंदविला.

ज्यांच्यासाठी रोजचे अन्नही संघर्ष आहे, अशा अत्यंत गरजू आजींपर्यंत जीवनावश्यक साहित्याचा आधार पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पितृपक्षाच्या निमित्ताने प्रियजनांच्या स्मृतींना सामाजिक सेवेची जोड देत गरजू वयोवृद्ध महिलांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.