Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

जाम गव्हाण जुगार छापा

जाम गव्हाण शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Jam Gavhan Gambling Raid: कळमनुरी तालुक्यातील जामगव्हाण शिवारी खदान जवळ जुगार अड्ड्यात मोकळ्या जागेत छापा टाकला. पोलिसांनी दुधंगाने ताब्यात घेतलेल्या ९६,४०० रुपयांची नकदी जप्त


जाम गव्हाण शिवारात जुगार अड्ड्यावर छापा ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

Jam Gavhan Gambling Raid |

 

दोघांना ताब्यात घेतले, पाचजण पोलीसांना बघून पसार 

आखाडा बाळापूर (Jam Gavhan Gambling Raid) :  कळमनुरी तालुक्यातील जामगव्हाण शिवारात खदाना जवळ मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला यात दोघेजण हाती लागले तर पाचजण पोलीसांना बघून पसार झाले.याबाबत २० ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २०ऑगस्ट रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी हरिभाऊ गुंजकर व भुजंग कोकरे पथकाने जामगव्हाण खदान जवळ मोकळ्या जागेत छापा टाकला यावेळी जुगार साहित्य, मोबाईल, दुचाकी ,रोख रक्कम असे ९६ हजार ४०० रुपये मुद्देमाल जप्त करून पोलिस कर्मचारी हरिभाऊ गुंजकर फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस स्थानकात आकाश उत्तमराव जाधव, जगदीश बन्सी राठोड व इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली बिट प्रमुख संतोष नागरगोजे हे करत आहेत.

पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता (Jam Gavhan Gambling Raid) पोलिसांना बघून जुगार अड्ड्यावरून पाच जण पसार झाले तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं समजपत्र देऊन सोडण्यात आले.पसार झालेल्या पाचजणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Related to this topic: