इसापूर धरण सिंचन योजना

​इसापूर धरणाच्या शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्या; हक्क संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा!

Isapur Dam Irrigation Project: इसापूर धरणाच्या जलाशयातील बहुप्रतिक्षित 'शेनोडी- रामवाडी उपसा जल सिंचन योजने'ला तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी

​इसापूर धरणाच्या शेनोडी-रामवाडी उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्या; हक्क संघर्ष समितीचा आक्रमक पवित्रा!

Isapur Dam Irrigation Project

 

​१ नोव्हेंबर रोजी इसापूर धरणाचा उजवा कालवा अडवणार,
तर ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन!
​लाभधारक गावांमध्ये बैठकांचा सपाटा; आंदोलनाची जय्यत तयारी

​कळमनुरी/ हिंगोली (Isapur Dam Irrigation Project) : इसापूर धरणाच्या जलाशयातील बहुप्रतिक्षित 'शेनोडी- रामवाडी उपसा जल सिंचन योजने'ला तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी मौजे शिवणी (खुर्द) आणि मौजे मसोड येथे नुकत्याच महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या.

​या (Isapur Dam Irrigation Project) दोन्ही आंदोलनांच्या पूर्वतयारीसाठी लाभधारक गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, शेतकरी, गावकरी, महिला आणि युवकांनी जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेनोडी- रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या १९५८ हेक्टर क्षेत्राच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्यानंतर, सर्वेक्षणाचे काम व निविदा प्रक्रिया पार पाडून कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू असतानाच या कामात नाहक खोडा घालण्यात आला. धरणात प्रत्यक्षात १९५८ हेक्टर सिंचन क्षमतेएवढेच पाणी उपलब्ध असताना, दुप्पटीने म्हणजेच ४००० हेक्टरचे सर्वेक्षण करण्याचे अवास्तव निर्देश संबंधित विभागाला देण्यात आल्यामुळे ही महत्त्वाची योजना  रखडली होती, ​संघर्ष समितीला हा प्रकार समजताच त्यांनी हिंगोली येथे अधीक्षक अभियंत्यांची भेट घेऊन, जादा क्षेत्राचा विनाकारण घातलेला खोडा काढून १९५८ हेक्टरचाच मूळ प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठवण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. अन्यथा १७ सप्टेंबर रोजी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर कार्यकारी संचालकांनी हा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला.

​शासन दरबारी लालफितीच्या कारभारात अडकलेल्या या (Isapur Dam Irrigation Project) प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळण्यासाठी संघर्ष समितीने राज्यसभा सदस्य खासदार डॉ. रामराव वडकुते, विधानपरिषद सदस्य श्रीमती प्रज्ञाताई राजीव सातव, कळमनुरीचे आमदार संतोषराव बांगर, माजी खासदार ॲड. शिवाजीराव माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदने दिली व हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.    
   
मात्र, अद्यापही शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. ​शासनाच्या या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या हक्क संघर्ष समितीने अखेर तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे. ​दिनांक १ नोव्हेंबर रोजी इसापूर धरणाचा उजवा कालवा अडविण्यात येईल. ​दिनांक ५ नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल.

​या (Isapur Dam Irrigation Project) आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मसोड आणि शिवणी येथे बैठका पार पडल्या असून, यापुढे रामवाडी, असोलवाडी, मुंडळ, शेनोडी आदी गावांमध्येही संपर्क व जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. भागातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
​