Inflation

दुष्काळ आणि महागाईची दुहेरी झळ; डाळी-कडधान्यांचे दर वाढले

दुष्काळ आणि महागाईमुळे ओतूरमध्ये घरखर्च वाढला; तूरडाळ १६० रुपये, गावरान मटकी २०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री.

दुष्काळ आणि महागाईची दुहेरी झळ; डाळी-कडधान्यांचे दर वाढले

Inflation

दुष्काळामुळे ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम; तूरडाळ किलोमागे १६० रुपये, गावरान मटकी २०० रुपयांवर

दिवाळीच्या खरेदीच्या काळात ओतूरमधील नागरिकांना वाढत्या महागाईमुळे खर्चाचा ताळमेळ राखणे कठीण होत आहे. दुष्काळामुळे उत्पन्नाबाबत अनिश्चितता असताना अन्नधान्य, डाळी आणि कडधान्यांच्या दरांत वाढ झाल्याने घरखर्चाचे गणित बिघडले आहे. मर्यादित उत्पन्नातून सणाचा खर्च आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अनेक कुटुंबांना काटकसर करावी लागत आहे.

डाळी, तांदूळ, खाद्यतेल, साखर, गहू, ज्वारी आणि बाजरी यांसारख्या वस्तूंसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान आणि उत्पादन घटल्याने त्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. वाढत्या खर्चामुळे काही कुटुंबांनी गरजेच्या वस्तूंची खरेदी कमी केली आहे.

निश्चित उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही घरभाडे, वीजबिल, शिक्षण, औषधोपचार, प्रवास आणि किराण्याच्या खर्चानंतर बचत करणे कठीण जात आहे. त्यामुळे अनपेक्षित खर्चासाठी पैसे बाजूला ठेवण्याची क्षमता कमी होत असल्याचे चित्र आहे.

किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो १६० रुपये, मूगडाळ १३० रुपये, सफेद आणि काळी उडीदडाळ प्रत्येकी १४० रुपये, चणाडाळ ११० रुपये, तर मसूरडाळ आणि अख्खा मसूर प्रत्येकी १०० रुपये दराने विकले जात आहेत.

कडधान्यांमध्ये मटकीचा दर प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गावरान मटकी २०० रुपये आणि केशर कस्तुरी मटकी १८० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. चवळीचे प्रकार १०० ते ११० रुपये, काबुली हरभरा १२० रुपये, काबुली बोल्ड १४० रुपये, हिरवा मूग १२० रुपये, हरभरा ९० रुपये आणि काळा वाटाणा १०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. या दरांमुळे दिवाळीची खरेदी आणि रोजच्या स्वयंपाकाचा खर्च सांभाळताना ग्राहकांची कसरत सुरू आहे.

संबंधित सामग्री

50 लाख शेतकरी पाच हजारांच्या मदतीपासून वंचित; फार्मर आयडी, ई-केवायसी करूनही प्रतीक्षाच!

50 लाख शेतकरी पाच हजारांच्या मदतीपासून वंचित; फार्मर आयडी, ई-केवायसी करूनही प्रतीक्षाच!

Drought-Affected Farmers: दिवाळी उलटून गेल्यानंतरही राज्यातील तब्बल 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम जमा झालेली नाही. विशेष म्हणजे, फार्मर आयडी आणि ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण...

Nov 16, 2026
मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

Farmers Free Electricity Scheme: शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सरकारकडून मोठ्या दिमाखात केली जात असली, तरी प्रत्यक्षात अपुरा वीजपुरवठा आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nov 16, 2026
दुष्काळाचा दुहेरी फटका; पिकांपाठोपाठ चारा-पाण्याअभावी पशुधनही संकटात!

दुष्काळाचा दुहेरी फटका; पिकांपाठोपाठ चारा-पाण्याअभावी पशुधनही संकटात!

Farmers' Drought Crisis: पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता दुष्काळाचे संकट (Farmers' Drought Crisis) शेतकऱ्यांसह पशुधनावरही ओढवले आहे.

Nov 15, 2026
अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार

अमूल-मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार

अमूल आणि मदर डेअरीनंतर आता गोकुळचे दूधही महागणार? चेअरमन राजेश पाटील यांचे संकेत; शनिवारी नव्या दरांबाबत निर्णय होण्याची शक्यता.

Nov 13, 2026
महागाईचा भडका! कांदा 116%, लसूण 60% महाग; किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या पार

महागाईचा भडका! कांदा 116%, लसूण 60% महाग; किरकोळ महागाई 6 टक्क्यांच्या पार

ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई 6.09 टक्क्यांवर! कांदा 116% आणि लसूण 60% महागल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका.

Nov 13, 2026