Rajesh Haridas Metange: आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे राजेश हरिदास मेटांगे यांची 'तंटामुक्ती समिती अध्यक्ष' म्हणून निवड गोंधळवाडी येथील गावात शांतता व एकजूटतेसाठी प्रेरक ठरली.
पातूर (Rajesh Haridas Metange) : ग्रामस्थांची एकजूट आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्यासाठी गोंधळवाडी येथे आयोजित विशेष ग्रामसभेत श्री. राजेश हरिदास मेटांगे यांची 'तंटामुक्ती समिती अध्यक्ष' म्हणून निवड करण्यात आली आहे. आदिवासी समाजातील एक अभ्यासू, शांत व कार्यतत्पर नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेश मेटांगे (Rajesh Haridas Metange) यांच्या निवडीमुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गावपातळीवरील वाद-विवाद आपापसात मिटवून गावात शांतता, सुव्यवस्था व बंधुभाव कायम राखण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. राजेश मेटांगे (Rajesh Haridas Metange) यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी समाजासह सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल आणि गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश मेटांगे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले व गावात कायम तंटामुक्ती आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची गवाही दिली.