पॉश कायदा अंमलबजावणी

पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस

POSH Act Implementation: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ अर्थात पॉश कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस

पॉश कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस

POSH Act Implementation

 

सर्व कार्यालयांना 'शी-बॉक्स' नोंदी अद्ययावत करण्याचे आवाहन

सुधीर गोगटे
हिंगोली (POSH Act Implementation) :
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम २०१३ अर्थात पॉश कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी न करणाऱ्या राज्यातील ६७२ कार्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यातील सर्व शासकीय व खासगी कार्यालये, संस्था आणि कंपन्यांनी कायद्यातील तरतुदींची पूर्तता करून केंद्र शासनाच्या शी-बॉक्स संकेतस्थळावरील नोंदी अद्ययावत कराव्यात, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्यातील तरतुदींची पूर्तता होते किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत जून २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या (POSH Act Implementation) मोहिमेसाठी राज्यात चार हजारांहून अधिक तपासणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या (POSH Act Implementation) मोहिमेंतर्गत आतापर्यंत राज्यातील ३ हजार ५७९ शासकीय आणि ३ हजार २९६ खासगी कार्यालये व कंपन्या अशा एकूण ६ हजार ८७५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नियमांची पूर्तता न केल्याप्रकरणी २९४ शासकीय आणि ३७८ खासगी कार्यालयांना जिल्हास्तरावरून एकूण ६७२ कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियंत्रण मंडळामार्फतही स्वतंत्रपणे नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू आहे.

पॉश कायद्यानुसार (POSH Act Implementation) शासकीय व खासगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांनी केंद्र शासनाच्या शी-बॉक्स संकेतस्थळावर आवश्यक नोंदणी करणे, अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना करून तिची नोंदणी करणे, समिती सदस्यांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, वार्षिक अहवाल सादर करणे तसेच संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. तपासणीदरम्यान निर्धारित नमुन्यातील ३१ मुद्द्यांच्या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींची पूर्तता झाली आहे किंवा नाही याची पडताळणी केली जात आहे. अनेक शासकीय कार्यालयांकडून आवश्यक नोंदणी, समिती स्थापना, प्रशिक्षण आणि वार्षिक अहवालासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करण्यात तसेच संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करण्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

नोटीस बजावल्यानंतर विहित मुदतीत आवश्यक पूर्तता न करणाऱ्या कार्यालये, संस्था व कंपन्यांविरुद्ध (POSH Act Implementation) पॉश कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित जिल्हा अधिकारी आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत कायद्यातील तरतुदींनुसार ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय व खासगी कार्यालये, संस्था, कंपन्या आणि त्यांच्या शाखांनी कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि शी-बॉक्स संकेतस्थळ अद्ययावत ठेवावे, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.