अवैध सावकारी प्रकरण

अवैध सावकारीच्या विळख्यातून शेतकरी महिलेची सुटका

Illegal Money-Lending Case: कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी महिला शोभाबाई रणवीर पाईकराव यांनी अवैध सावकाराविरुद्ध दिलेला चौदा वर्षांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे...

अवैध सावकारीच्या विळख्यातून शेतकरी महिलेची सुटका

Illegal Money-Lending Case

 

हिंगोलीच्या जिल्हा निबंधक सुरेखा फुपाटे यांचा सावकाराला दणका

हिंगोली (Illegal Money-Lending Case) : कळमनुरी तालुक्यातील शेनोडी येथील शेतकरी महिला शोभाबाई रणवीर पाईकराव यांनी अवैध सावकाराविरुद्ध दिलेला चौदा वर्षांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम २०१४ अंतर्गत दाखल असलेल्या या प्रकरणात सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली सुरेखा फुपाटे यांनी सावकाराला दणका देत शेतकरी महिलेला न्याय मिळवून दिला आहे.

शोभाबाई पाईकराव यांनी २०१२ साली मुलीच्या लग्नासाठी कळमनुरी येथील इंदुबाई लक्ष्मणराव राऊत यांच्याकडून १ लाख ४१ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जापोटी इंदुबाई राऊत यांनी शोभाबाई यांची गट नंबर ६० मधील एक हेक्टर वीस आर शेतजमीन खरेदीखत दस्त क्रमांक १०२८ सन २०१२ अन्वये आपल्या नावावर करून घेतली होती. हा व्यवहार केवळ कर्जाची हमी म्हणून करण्यात आला होता. पैसे परत करूनही जमीन परत मिळत नसल्याने शोभाबाई यांनी  विशेष निबंधक पुणे यांच्याकडे दाद मागितली होती. या प्रकरणात विशेष निबंधक कार्यालयाने सदर प्रकरण फेर सुनावणीसाठी हिंगोली जिल्हा निबंधक कार्यालयात फेर सुनावणी घेण्यात आली.

या (Illegal Money-Lending Case) प्रकरणात पुराव्याची तपासणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाची जिल्हा निबंधक कार्यालयात प्रदीर्घ सुनावणी झाली. एकूण पस्तीस तारखांना दोन्ही पक्षांना सुनावणीची संधी देण्यात आली. अर्जदाराच्या वतीने नुरखॉ पठाण, रणवीर पाईकराव, पांडुरंग मस्के, भिमराव पाईकराव, प्रताप पाईकराव, जळबा कांबळे, सादुल्ला खॉ आणि इलियास खॉ यांच्यासह अकरा साक्षीदारांनी शपथपत्र देऊन साक्ष नोंदवली की हा व्यवहार सावकारी कर्जापोटी झाला आहे. तसेच तलाठी आणि चौकशी अधिकारी यांनी केलेल्या स्थळपंचनाम्यात या जमिनीची वहिवाट आजही शोभाबाई पाईकरावच करत असल्याचे स्पष्ट झाले. याउलट गैरअर्जदार इंदुबाई राऊत यांना हा व्यवहार सरळ खरेदी असल्याचे सिद्ध करता आले नाही.

सर्व पुरावे आणि साक्षी तपासल्यानंतर जिल्हा निबंधक सुरेखा फुपाटे यांनी २२ ऑक्टोबर रोजी अंतिम आदेश दिला. या आदेशात त्यांनी गट नंबर ६० मधील खरेदीखत हे अवैध सावकारी पोटी झालेले असल्याचे घोषित केले आहे. तसेच सदर १ हेक्टर २० आर जमीन आणि तिचा कब्जा मूळ मालक शोभाबाई रणवीर पाईकराव यांना तात्काळ परत करण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश अभिहस्तांतरण पत्र असून तहसीलदार कळमनुरी यांनी या जमिनीचा फेर शोभाबाई यांच्या नावाने नोंदवावा असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निकालामुळे तालुक्यातील अवैध सावकारीला बळी पडलेल्या शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

Kalamnuri illegal money-lending case: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अवैध सावकारी प्रकरणात कळमनुरी तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sep 29, 2026