मानोरा (Manora Illegal Brick Kiln) : तहसील कार्यालयाकडून काही मोजक्याच विटभट्टीला परवानगी असताना सध्या शहरलगत व ग्रामीण परिसरात किमान ३० ते ३५ वीटभट्या सुरू आहेत. प्रदूषण नियंत्रक विभागाकडून ना- हरकत प्रमाणपत्र काही वीटभटीधारक वगळता इतरांनी परवानगी न घेता बिनबोभाट खुलेआम आपला व्यवसाय करीत आहे. यामुळे शहर तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे याकडे लक्ष केंद्रीत करून कार्यवाही करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांमधून होत आहे.
यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पाण्याची पातळी खालावली असुन नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावात माहे ऑक्टोंबर महिन्यातच पाण्याची टंचाई भासत आहे. जनावरे सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करीत आहेत. अशातच पाण्याचा उपसा करून अनेक (Manora Illegal Brick Kiln) वीट भट्टीधारक आपला कारखाना चालवित आहेत. विट भट्टीकरिता इंधन म्हणून वापरात येणाऱ्या दगडी कोळशाच्या ज्वलनानंतर सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड, आणि नायट्रोजणमधील आक्सईड या विषारी वायुचे उत्सर्जन होते. या विषारी वायुतील सल्फरडायआक्सईडमुळे डोळ्याचे विकार आणि फुफुसाचे व त्वचेचे आजार होतात.
तसेच कार्बनमोनाक्सईड व कार्बन डायआक्सईड या विषारी वायूमुळे परिसरातील तापमाणात वाढ होऊन शेतीवर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या सर्व कारणामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने विट्टभटी सुरु करण्यासंदर्भातील नियम सक्तीचे केले आहे. तालुक्यातील वीटभटी मालक प्रदूषण नियंत्रण मंडळाची कुठलीच परवानगी न घेता राजरोषपणे वीटभटीचा कारखाना चालवीत आहे. तालुक्यात ३५ च्या जवळपास (Manora Illegal Brick Kiln) वीटभटी कारखाने आहेत, त्याचा तालुक्यातील शेतीवर, नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर गंभीर परिणाम असुन याकडे महसूल मंडळातील काही अधिकारी, मंडळ अधिकारी, पटवारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असुन विट भट्टी उद्योगासाठी पाण्याचा वापरही सर्रास सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मातीचे अवैध उत्खनन
विट बनविण्यासाठी होते. माती हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून बहुतांश (Manora Illegal Brick Kiln) वीटभट्टी धारक गावातील ई क्लास किंवा नदी जवळील मातीचे अवैध उत्खनन करून वीट बनविण्यासाठी वापर करतात. हे यंत्रनेला माहित आहे कोणत्या गावात किती वीटभटी धारक आहे, याची माहिती असून सुद्धा यंत्रणा गप्प आहे, याचे गंभीर परिणाम मात्र नागरिक भोगत आहे.
आमकिन्ही, कुपटा, गिरोली , इंझोरी, पोहरादेवी, आमगव्हाण सह अनेक गावाला लागून वीटभटी कारखाने लागले आहे. वीटभट्टीमधून निघणारे धूर शाळेतील लहान मुलासाठी खूपच घातक आहे. असे असले तरी तालुक्यातील कोणताच सरपंच किंवा सचिव यांनी महसूल प्रशासनाकडे तक्रार करत नाही, त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूपमुळे विटभट्टीचा अवैध व्यवसाय राजरोसपणे खुलेआम सुरू असल्याचे दिसून येत आहे.