Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

लिंबाळा हळद चोरी

लिंबाळा मक्ता भागातील गोदाम फोडून सव्वादोन लाखाचे हळदीचे कट्टे पळविले..

Limbala Turmeric Theft: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील माऊली अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या गोदामाचे शटरचा पत्रा  वाकवून सव्वादोन लाख  रुपयाचे हळदीचे ३० कट्टे   चोरून नेल्याने गुन्हा नोंदविण्यात आला.


लिंबाळा मक्ता भागातील गोदाम फोडून सव्वादोन लाखाचे हळदीचे कट्टे पळविले

हिंगोली (Limbala Turmeric Theft) : शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील माऊली अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या गोदामाचे शटरचा पत्रा  वाकवून सव्वादोन लाख  रुपयाचे हळदीचे ३० कट्टे   चोरून नेल्याने गुन्हा नोंदविण्यात आला.

या बाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी  की, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील भुसार व्यापारी   दत्तराव शिंदे यांची माऊली अ‍ॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी असून त्या ठिकाणी  शेती माल करण्यात येतो. लिंबाळा मक्ता शिवारात त्यांचा गोदाम असल्याने हळदीसह इतर शेतीमाल गोदामात ठेवला जातो. २३ ते २४ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत  कोणीतरी  अज्ञात चोरट्याने गोदामाचे शटर  वाकवून त्यामधील २ लाख २५ हजार रुपयाचे हळदीचे १ क्विंटलचे ३० कट्टे चोरून नेले. २४ ऑगस्टला  शिंदे  हे गोदामाकडे आले असता त्यांना गोदामाचे शटर उघडले दिसून आले. आतमध्ये पाहणी केल्यानंतर हळदीचे कट्टे चोरीस गेल्याचे दिसून आले.  

या बाबत हिंगोली ग्रामीण पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक  विष्णुकांत गुठ्ठे यांच्यासह   पोलिस  उपनिरीक्षक राहूल  घुले,  जमादार असलम गारवे, सुधीर ढेंबरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी  केली. या प्रकरणात  शिंदे यांनी हिंगोली ग्रामीण पोलिसात  दिलेल्या  तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा  दाखल करण्यात आला. पुढील तपास  पोलिस उपनिरीक्षक राहूल घुले  हे करीत आहेत.