पैनगंगा नदीकाठ उपोषण

पैनगंगा नदीकाठावर उपोषणाचा दुसरा दिवस; शेकडो महिला-शेतकऱ्यांचा सहभाग!

Painganga River Hunger Strike: पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणी नियोजनासह वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी पेनसावंगी पुलावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस

पैनगंगा नदीकाठावर उपोषणाचा दुसरा दिवस; शेकडो महिला-शेतकऱ्यांचा सहभाग!

(Painganga River Hunger Strike)

 

पाणी नियोजनात अन्याय नको; वेळीच निर्णय घ्या, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू – शेतकऱ्यांसह सरनाईक यांचा इशारा

चिखली (Painganga River Hunger Strike) : पेनटाकळी प्रकल्पाच्या पाणी नियोजनासह वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी पेनसावंगी पुलावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असून आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. या (Painganga River Hunger Strike) आंदोलनात परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसह महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

हळद, तूर आणि जनावरांसाठीचा चारा वाचविण्यासाठी स्प्रिंकलर व ठिबक सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे, चिखली तालुक्यांतील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, चिखली, मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे या अनुषंगाने तोडगा काढण्यात यावा,तसेच चिखली तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी पिण्याच्या पाण्याचा आवश्यक साठा राखून उर्वरित पाण्याचे समन्यायी नियोजन करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

पेनटाकळी प्रकल्पाच्या उपसा सिंचनावर (Painganga River Hunger Strike) अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता पाणी आणि वीज प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घ्यावा. वेळीच दखल घ्या, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू. आंदोलनाची तीव्रता वाढल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

पेनटाकळीच्या पाण्याचे नियोजन जाहीर करा; शेतकऱ्यांवरील दडपशाही सहन करणार नाही!

पेनटाकळीच्या पाण्याचे नियोजन जाहीर करा; शेतकऱ्यांवरील दडपशाही सहन करणार नाही!

Farmers Hunger Strike: पेनटाकळी प्रकल्पातील पाणीवाटपाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, उपसा सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या तोडण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाविरोधात धरणग्रस्त शेतकरी..

Nov 03, 2026
आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

Tehsildar office Hunger strike: आखाडा बाळापूर तालुका निर्मिती अप्पर तालुका घोषित करा या मागणीसाठी २ आक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आखाडा बाळापूर तालुका कृती समितीच्या वती

Oct 02, 2026
एसटी आरक्षणाच्या मागणीच्या उपोषणाची तूर्तास सांगता; न्या. टहलियानी अभ्यास समितीला मुदतवाढ!

एसटी आरक्षणाच्या मागणीच्या उपोषणाची तूर्तास सांगता; न्या. टहलियानी अभ्यास समितीला मुदतवाढ!

पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण तूर्तास स्थगित; न्या. टहलियानी अभ्यास समितीला अहवालासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ.

Sep 21, 2026
ना. संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

ना. संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

मंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून जिंतूर व पोहरादेवी येथील बंजारा समाजाच्या आमरण उपोषणावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली.

Sep 18, 2026
मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटलांचे २० दिवसांचे उपोषण मागे; मराठा आरक्षणासाठी सरकारला ९० दिवसांची मुदत

मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांचे उपोषण मागे घेत सरकारला मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी ९० दिवसांची मुदत दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला.

Sep 17, 2026