पुलाच्या बांधकामस्थळी सुरक्षेचा अभाव;
सूचना फलक, बॅरिकेड्स आणि प्रकाशव्यवस्था नसल्याचा आरोप, कंत्राटदारावर कारवाईची मागणी
कन्हान (National Highway Horrific Accident) : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर बुधवारी पहाटे भीषण अपघात घडला. जबलपूरहून नागपूरकडे जाणारी प्रवासी बस दुमरी परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या सुमारे सहा फूट खोल खड्ड्यात कोसळून उलटली. या (National Highway Horrific Accident) दुर्घटनेत बसचालक सुनील यादव यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले.
पहाटेच्या सुमारास दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, बस क्रमांक MH27-8X 6521 जबलपूरहून नागपूरच्या दिशेने जात होती. बुधवारी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास दुमरीजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळली. अतिवेगामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असली, तरी नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
या (National Highway Horrific Accident) दुर्घटनेनंतर महामार्गावरील बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुलाचे काम संथ गतीने सुरू असून, परिसरात सूचना फलक, बॅरिकेड्स आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना खड्डे असून रस्त्यावर राखड पसरलेली असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या (National Highway Horrific Accident) प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार यंत्रणेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. अपघाताची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.