Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पाणीपुरवठा बंद

हिंगोली शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार; महा रेलच्या कामामुळे निर्णय

Hingoli Water Supply Bandh: महारेलच्या कामामुळे हिंगोली शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. महामार्गाच्या परिसरात जलवाहिनीच्या पाईपलाईनचे आवश्यक काम हाती घेण्यात येणार


हिंगोली शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार महा रेलच्या कामामुळे निर्णय

Hingoli Water Supply Bandh |

हिंगोली (Hingoli Water Supply Bandh) : महारेलच्या कामामुळे हिंगोली शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. महामार्गाच्या परिसरात जलवाहिनीच्या पाईपलाईनचे आवश्यक काम हाती घेण्यात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर आणि ०३ सप्टेंबर या दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत जलपुरवठा प्रणालीच्या क्षेत्रात पाईपलाईन स्थलांतर व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, मात्र कामाच्या स्वरूपानुसार पाणीपुरवठा सुरू होण्यास काहीसा विलंब लागू शकतो, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या (Hingoli Water Supply Bandh) पार्श्वभूमीवर नागरिकांनी दोन दिवस अगोदरच आपल्या गरजेनुसार पुरेसे पाणी साठवून ठेवावे आणि पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.