Hingoli Ration Shop: रास्त भाव दुकानांच्या ६८ रिक्त जागांसाठी जाहीर प्रकटन काढण्यात आले होते. त्यापैकी वसमत, सेनगाव व कळमनुरी तालुक्यात प्रत्येकी १ तर औंढा नागनाथ तालुक्यात २ असे एकूण ०५ आक्षेप अर्ज
४ ठिकाणी आक्षेपामुळे प्रक्रिया स्थगित
हिंगोली (Hingoli Ration Shop) : जिल्ह्यात रास्त भाव दुकानांच्या ६८ रिक्त जागांसाठी जाहीर प्रकटन काढण्यात आले होते. त्यापैकी वसमत, सेनगाव व कळमनुरी तालुक्यात प्रत्येकी १ तर औंढा नागनाथ तालुक्यात २ असे एकूण ०५ आक्षेप अर्ज प्राप्त झाल्याने संबंधित ठिकाणची जाहीर प्रकटन प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. उर्वरित ६३ गावांमध्ये सदर प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे.
या प्रक्रियेमधील तालुकानिहाय स्थिती पुढीलप्रमाणे आहे हिंगोली तहसील मध्ये एकूण ०८ गावांमध्ये प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी ५ गावांमध्ये रास्त भाव दुकान मंजूर करण्यात आले. १ गावाकरिता एकही आवेदन अर्ज प्राप्त झाला नाही, तर २ गावांकरिता प्राप्त अर्जांपैकी कोणताही गट, संस्था सक्षम नसल्याने जाहीर प्रकटन रद्द करण्यात आले आहे.
औंढा नागनाथ: एकूण १२ ठिकाणी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी ८ ठिकाणी दुकाने मंजूर करण्यात आली. २ ठिकाणी अर्ज प्राप्त झाले नसून, २ ठिकाणी कोणताही गट, संस्था पात्र नसल्याने प्रक्रिया रद्द करण्यात आली.
सेनगाव : एकूण ५ गावांमध्ये प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली असून, सर्व ५ ठिकाणी रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात आली आहेत. वसमत : एकूण ४ ठिकाणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. त्यापैकी ३ दुकाने मंजूर करण्यात येत असून, एका ठिकाणी कोणताही गट सक्षम नसल्याने प्रक्रिया रद्द झाली.
कळमनुरी : एकूण ३३ ठिकाणी प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. त्यापैकी ८ ठिकाणी कोणताही गट सक्षम व पात्र नसल्याने, ६ ठिकाणी अर्जच न आल्याने जाहीर प्रकटन रद्द करण्यात आले आहे. तर १९ ठिकाणी नवीन रास्त भाव दुकाने मंजूर करण्यात येत आहेत. सदर प्रक्रिया शासनाच्या विहित नियम व निकषांनुसार राबविण्यात आली असून, प्राप्त आवेदन अर्जाची पात्रता व सक्षम तेची तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.