Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली पाऊस

हिंगोली जिल्ह्यात पाऊस रुसला पावसाची मोठी तूट, ८२.९ मिमी पावसाची कमतरता

Hingoli Rainfall: जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिली असून जिल्ह्यात सध्या पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी केवळ १०६.० मिमी पावसाची नोंद झाली


हिंगोली जिल्ह्यात पाऊस रुसला पावसाची मोठी तूट ८२९ मिमी पावसाची कमतरता

Hingoli Rainfall |

 

आतापर्यंत  १०६ मिमीच पाऊस; सर्व ३० मंडळांत सरासरी पेक्षा कमी

शिवाजी मेटकर
हिंगोली (Hingoli Rainfall) : 
जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिली असून जिल्ह्यात सध्या पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. २० ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी केवळ १०६.० मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस अपेक्षित सामान्य पावसाच्या तुलनेत खूपच कमी आहे.

ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात (१ ते १५ ऑगस्ट) जिल्ह्यात अपेक्षित १३२.३ मिमी पावसाऐवजी केवळ ४९.४ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजे सुमारे ८२.९ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सर्व ३० महसूल मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.सर्वात कमी पाऊस वसमत तालुक्यातील कुरुंदा मंडळात २०.५ मिमी झाला तर सर्वाधिक पाऊस  कळमनुरी तालुक्यातील वाकोडी मंडळात १०२.३ मिमी पाऊस झाला.

इतर मंडळांमधील पावसाची स्थिती पुढील प्रमाणे : हिंगोली ५९ मिमी, नरसी नामदेव ७४.१ मिमी, सिरसम ५०.२ मिमी, बासंबा ५६ मिमी, माळहिवरा ५४.३ मिमी, खांबाळा ७५.३ मिमी, कळमनुरी ६५.७ मिमी, गिरगाव ८४.७ मिमी, सेनगाव ६६.५ मिमी, गोरेगाव ७१.६ मिमी, आजेगाव ९०.३ मिमी आणि हत्ता ५२.५ मिमी पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या रिमझिम पावसामुळे सद्यस्थितीत पीकांची परिस्थिती समाधानकारक दिसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जमिनीत ओलावा असल्याने सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी ते समाधान कारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र विहीर, बोअरवेल व सिंचन तलावात पाणी पातळीत वाढ अपेक्षित असताना ती झालेली नाही यामुळे जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पावसाअभावी धरणांतील पाणीसाठाही घटला आहे. इसापूर धरणात ६७.५९ टक्के (Hingoli Rainfall) पाणीसाठा सिद्धेश्वर धरणात केवळ ३१.६९ टक्के पाणीसाठा आहे. सिद्धेश्वर धरणातून हिंगोली व वसमत शहराला पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात सिद्धेश्वरमध्ये ९५ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र तो एक तृतीयांशवर आल्याने पाणीटंचाईची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात पहिल्या पंधरवड्यात तालुका निहाय पाऊस मिमीमध्ये हिंगोली तालुका अपेक्षित पाऊस १४६.६ प्रत्यक्ष पाऊस ५९.५, टक्केवारी ५९.५, कळमनुरी तालुका अपेक्षित पाऊस १३६.६ प्रत्यक्ष पाऊस ५४.७, टक्केवारी ४०.१, वसमत तालुका अपेक्षित पाऊस ११९.१ प्रत्यक्ष पाऊस ३७.१, टक्केवारी ३१.१ औंढा नागनाथ तालुका अपेक्षित पाऊस १२१ प्रत्यक्ष पाऊस २६.९, टक्केवारी २२.२, सेनगाव तालुका अपेक्षित पाऊस ११६. ९ प्रत्यक्ष पाऊस ६१.९, टक्केवारी ५३ आहे.