हिंगोली नवदुर्गा मंडळ

हिंगोलीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरस्वती नगरच्या नवदुर्गा मंडळाचा स्तुत्य निर्णय

Hingoli Navdurga Mandal: सरस्वती नगर येथील श्री शिव सरस्वती नवदुर्गा महोत्सव समिती, यांनी यंदा सामाजिक बांधिलकी जपत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी मंडळातर्फे

हिंगोलीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरस्वती नगरच्या नवदुर्गा मंडळाचा स्तुत्य निर्णय

Hingoli Navdurga Mandal

 

वर्गणीतील उर्वरित रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार

हिंगोली (Hingoli Navdurga Mandal) : येथील सरस्वती नगर येथील श्री शिव सरस्वती नवदुर्गा महोत्सव समिती, यांनी यंदा सामाजिक बांधिलकी जपत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हितासाठी मंडळातर्फे यंदा एक नवीन सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंडळाला मिळणाऱ्या वर्गणीमधून महोत्सवाचा सर्व खर्च वजा केल्यानंतर उर्वरित संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे.

शेतकरी संकटात असताना आपणही त्यांच्या सोबत उभे राहिले पाहिजे. मदत छोटी असली तरी भावना मोठी आहे; आपल्या परीने जेवढे शक्य आहे तेवढे आपण नक्की करू,अशी भावना समितीने व्यक्त केली आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. अशा कठीण काळात आपल्या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत शेतकरी बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा समितीचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

हा निर्णय प्रमुख मार्गदर्शक शशांक बुरसे, अध्यक्ष स्वप्नील इंगळे, उपाध्यक्ष ऋषिकेश शहाणे, सचिव विशाल ठाकूर, कोषाध्यक्ष नागेश संगेकर यांच्यासह सदस्य  सतीश पठाडे, प्रा. अनिकेत गंधेवार, डॉ. स्वप्नील सावके, अॅड. उमेश पाटील, नितीन गायकवाड, बाळू मते पाटील, सागर भोपे, निलेश पाटील, शरद यादव, कार्तिक राठोड, लखन व्यास, विजू मते पाटील, रमण व्यास आणि आयोजक अॅड. राजेश  गोटे मित्र मंडळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

टैग्स: Hingoli Navdurga Mandal