हिंगोली मुस्लिम बांधव

हिंगोलीत पावसासाठी सामूहिक दुआ; कयाधू नदीकाठी मुस्लिम बांधवांनी अदा केली नमाज-ए- इस्तिस्का

Hingoli Muslim Samaj: या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील जमीयत उलेमा-ए-हिंद आणि हाफिज-ए-किराम यांच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी पावसासाठी विशेष नमाज-ए- इस्तिस्का अदा करण्यात आली.

हिंगोलीत पावसासाठी सामूहिक दुआ; कयाधू नदीकाठी मुस्लिम बांधवांनी अदा केली नमाज-ए- इस्तिस्का

Hingoli Muslim Samaj

हिंगोली (Hingoli Muslim Samaj) : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील जमीयत उलेमा-ए-हिंद आणि हाफिज-ए-किराम यांच्या वतीने 10 सप्टेंबर रोजी पावसासाठी विशेष नमाज-ए- इस्तिस्का अदा करण्यात आली. शहरातील कयाधू नदीच्या काठावर, आझम कॉलनी परिसरात सकाळी (Hingoli Muslim Samaj) मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी दोन रकात नमाज अदा करून अल्लाहकडे पावसासाठी गयावया करून दुआ मागण्यात आली.

यावेळी बोलताना उलेमांनी सांगितले की, "पाण्यावरच संपूर्ण मानवतेचे अस्तित्व अवलंबून आहे. पाऊस न पडल्याने आज शेतकरी, जनावरे आणि माणसे सर्वच हैराण झाले आहेत. आमच्या गुनाहांमुळे, आमच्या पापांमुळे अल्लाह पाऊस रोखतो. त्यामुळे आज आम्ही सर्वजण येथे एकत्र येऊन आपल्या गुनाहांची माफी मागितली आणि अल्लाहकडे पाऊस पाडण्यासाठी प्रार्थना केली आहे. पाऊस पाडणारा फक्त अल्लाहच आहे."

हा उपक्रम सलग तीन दिवस चालणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.  उद्या शनिवारी सकाळी 10 वाजता खुशाल नगर येथे आणि 12 फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी 10 वाजता जामिया रहमानिया, नर्सी रोड येथे नमाज-ए-इस्तिस्का आणि दुआचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त (Hingoli Muslim Samaj) मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जमीयत उलेमाच्या वतीने करण्यात आले आहे.

टैग्स: Hingoli Muslim Samaj