हिंगोली नगर पालिका

हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला बदली

Hingoli Municipal Council: नगर परिषद प्रशासन संचालनालय ३० ऑक्टोंबरला काढलेल्या आदेशात हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला पदोन्नतीवर बदली झाली आहे..

हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला बदली

Hingoli Municipal Council

 

जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायत मधील इतर काही जणांच्या बदल्या

हिंगोली (Hingoli Municipal Council) : महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा सवंर्ग (गट क) कर्मचार्‍यांच्या विनंती/ विशेष बाब या अंतर्गत नगर परिषद प्रशासन संचालनालय ३० ऑक्टोंबरला काढलेल्या आदेशात हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला पदोन्नतीवर बदली झाली आहे. या सोबतच जिल्ह्यातील इतर काही जणांच्या बदल्या झाल्या आहेत. 

३० ऑक्टोंबर रोजी नगर परिषद प्रशासन संचालनालय आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांनी काढलेल्या आदेशात हिंगोली नगर पालिकेतील स्थापत्य अभियंता श्रेणी - ब  चे प्रतिक प्रकाश नाईक यांची वाशिम येथे श्रेणी क पदोन्नतीवर बदली झाली आहे. मागील काही वर्षापूर्वी प्रतिक नाईक हे हिंगोली नगर पालिकेमध्ये रूजू झाले होते. शहरातील अनेक विकास कामांमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा ठरला. विकासाच्या कामावर बारकाईने लक्ष घालून  ही कामे स्वच्छ व सुंदर होण्याकरीता त्यांनी विशेष लक्ष घातले होते.

विशेष म्हणजे शहरातील जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. या ठिकाणी झालेल्या विकास कामामध्ये त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. या सोबतच शहरातील रस्ते विकासाची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी प्रयत्न केले.  प्रतिक नाईक यांच्या बदली सोबतच जिल्ह्यातील इतर काही जणांच्या बदल्या झाल्या आहेत. कळमनुरी नगर पालिकेतील स्थापत्य अभियंता श्रेणी क अमोल मधुकर मोरे यांची लातूर जिल्ह्यातील औसा येथे श्रेणी क च्या रिक्त पदी बदली झाली आहे. 

सेनगाव नगर पंचायत मधील श्रेणी ब कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी दिपीका बबनराव राऊत (कदम) यांची डिएओ हिंगोली येथे सहाय्यक पदी प्रतिनियुक्तीने बदली झाली. त्याच प्रमाणे वसमत नगर पालिकेतील श्रेणी ब स्वच्छता निरीक्षक बालाजी रावसाहेब सोनवणे यांची कळमनुरी नगर परिषद श्रेणी क पदोन्नतीवर बदली झाली.  या सोबतच इतर जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यामध्ये येणार्‍या अधिकार्‍यांमध्ये डीएओ वर्धा येथील कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी श्रेणी क वैभव देविदास पांडे यांची हिंगोली येथे श्रेणी क चे रिक्त पदी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील श्रेणी क. लेखापाल व लेखापरिक्षक योगिता प्रकाश राठोड यांची सेनगाव नगर पंचायतमध्ये श्रेणी क. रिक्तपदी बदली झाली.

 छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण येथील श्रेणी ब. स्वच्छता निरीक्षक सौरभ युवराज हलमारे यांची वसमत नगर परिषद श्रेणी ब रिक्तपदी बदली झाली. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील श्रेणी ब. कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी रामलिंग शंकरअप्पा महाजन यांची वमसत नगर परिषद श्रेणी अ. वर बदली झाली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील स्थापत्य अभियंता नारायण महादू इंगोले यांची वसमत नगर परिषद श्रेणी अ.च्या रिक्तपदी बदली झाली.

संबंधित सामग्री

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नळ दुरुस्तीचे आवाहन; अन्यथा नळजोडणी खंडित होणार- नगरपरिषद हिंगोली

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नळ दुरुस्तीचे आवाहन; अन्यथा नळजोडणी खंडित होणार- नगरपरिषद हिंगोली

Hingoli Municipal Council: हिंगोली शहरातील सर्व घरगुती नळधारकांना नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या घरातील नळांमधून पाण्याची गळती होत असल्यास संबंधित नळांची तात्काळ...

Oct 27, 2026
हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मदतीसाठी पाठविला प्रस्ताव

हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मदतीसाठी पाठविला प्रस्ताव

Hingoli Municipal Council Fire Brigade: शहरातील मारवाडी गल्ली भागात एका घरामध्ये साठवणुक केलेल्या फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

Oct 14, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स. बासिद यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम युक्तीवाद पूर्ण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स. बासिद यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम युक्तीवाद पूर्ण

Hingoli Municipal Council: हिंगोली नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रभाग क्रमांक १४-ब मधील नगरसेवक सय्यद बासित सय्यद हबीब यांना चार अपत्ये असल्याच्या आरोपा वरून त्यांचे नगरसेवक..

Oct 13, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

Hingoli Municipal Council: राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील नमुना क्रमांक ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी बंधनकारक आहे की नाही याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संभ्रमावर नगर विकास

Sep 04, 2026