हिंगोली नगरपरिषद

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नळ दुरुस्तीचे आवाहन; अन्यथा नळजोडणी खंडित होणार- नगरपरिषद हिंगोली

Hingoli Municipal Council: हिंगोली शहरातील सर्व घरगुती नळधारकांना नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या घरातील नळांमधून पाण्याची गळती होत असल्यास संबंधित नळांची तात्काळ...

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नळ दुरुस्तीचे आवाहन; अन्यथा नळजोडणी खंडित होणार- नगरपरिषद हिंगोली

Hingoli Municipal Council

 

नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर व मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांचा इशारा

हिंगोली (Hingoli Municipal Council) : हिंगोली शहरातील सर्व घरगुती नळधारकांना नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या घरातील नळांमधून पाण्याची गळती होत असल्यास संबंधित नळांची तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी. तसेच पाणी भरून झाल्यानंतर नळ व्यवस्थित बंद करता यावा आणि पाण्याचा अपव्यय टाळता यावा, यासाठी प्रत्येक नळाला योग्य प्रकारची तोटी किंवा नळाची बंद करण्याची व्यवस्था बसवून घ्यावी.

शहरातील पाण्याचा अपव्यय रोखणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे व सर्व नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होण्यास मदत करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणत्याही नळातून पाणी विनाकारण वाहू देऊ नये. नळ सुरू ठेवल्यामुळे होणारी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी सर्व नळधारकांनी आवश्यक ती दुरुस्ती व उपाययोजना तातडीने करून घ्याव्यात.

सदर सूचनेची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या नळांची दुरुस्ती करून घ्यावी व पाणी भरल्यानंतर नळ बंद करण्यासाठी आवश्यक ती तोटी बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपल्या घरगुती नळातून पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आल्यास आपली नळजोडणी खंडित करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी वाचवा, जीवन वाचवा, असे आवाहन अध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर, आणि मुख्याधिकारी प्रांजली मुंडे नगरपरिषद हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला बदली

हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला बदली

Hingoli Municipal Council: नगर परिषद प्रशासन संचालनालय ३० ऑक्टोंबरला काढलेल्या आदेशात हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला पदोन्नतीवर बदली झाली आहे..

Nov 01, 2026
हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मदतीसाठी पाठविला प्रस्ताव

हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मदतीसाठी पाठविला प्रस्ताव

Hingoli Municipal Council Fire Brigade: शहरातील मारवाडी गल्ली भागात एका घरामध्ये साठवणुक केलेल्या फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

Oct 14, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स. बासिद यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम युक्तीवाद पूर्ण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स. बासिद यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम युक्तीवाद पूर्ण

Hingoli Municipal Council: हिंगोली नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रभाग क्रमांक १४-ब मधील नगरसेवक सय्यद बासित सय्यद हबीब यांना चार अपत्ये असल्याच्या आरोपा वरून त्यांचे नगरसेवक..

Oct 13, 2026
हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीत धुमाकूळ घातलेल्या गायीला नगरपालिकेच्या पथकाने पकडले

हिंगोलीच्या ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर नागरिकांच्या अंगावर धावणाऱ्या पिसाळलेल्या गायीला नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीच्या प्रयत्नांनंतर ताब्यात घेतले.

Sep 13, 2026
नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

नगरपरिषद नगरपंचायत मधील नगराध्यक्षांना असलेले वित्तीय व कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार संपुष्टात

Hingoli Municipal Council: राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील नमुना क्रमांक ६४ वर नगराध्यक्षांची स्वाक्षरी बंधनकारक आहे की नाही याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या संभ्रमावर नगर विकास

Sep 04, 2026