हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दल

हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मदतीसाठी पाठविला प्रस्ताव

Hingoli Municipal Council Fire Brigade: शहरातील मारवाडी गल्ली भागात एका घरामध्ये साठवणुक केलेल्या फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

हिंगोली नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना मदतीसाठी पाठविला प्रस्ताव

Hingoli Municipal Council Fire Brigade

 

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाणार

हिंगोली (Hingoli Municipal Council Fire Brigade) : शहरातील मारवाडी गल्ली भागात  एका घरामध्ये साठवणुक केलेल्या फटाक्याच्या गोदामाला लागलेल्या आगीत नगर परिषद अग्नीशमन दलातील दोन कर्मचार्‍यांचा  मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या वारसांना प्रत्येकी  ५० लाख रुपये आर्थिक मदतीचा प्रस्ताव नगर पालिकेने  पाठविला  आहे.

हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली भागात ५ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास  विजयकुमार  बासटवार यांच्या निवासस्थानात  साठवणुक केलेल्या फटाक्याच्या गोदामाला भिषण आग लागली होती. यामध्ये आग विझवितांना  अग्नीशमन दलातील दिलीप  दोडके, व कंत्राटी कर्मचारी आकाश  सांगळे या दोन  कर्मचार्‍याचा  लातूर  येथील रुग्णालयात  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या  घटनेतील  रवि कांबळे  याच्यावर अद्याप लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दरम्यान या (Hingoli Municipal Council Fire Brigade) घटनेमध्ये गंभीररित्या  भाजलेल्या तिन्ही  कर्मचार्‍यांच्या उपचाराकरीता  नगर पालिकेकडून १ लाख रुपयाची मदत नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर  यांनी तात्काळ  जाहिर केली होती. या घटनेमध्ये अग्नीशमन  दलातील दिलीप दोडके व आकाश सांगळे या दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याने हिंगोली नगर  पालिका प्रशासनासह शहरावर शोककळा पसरली होती. या घटनेमुळे  दोन मयत कर्मचार्‍यांच्या वारसांना शासनाकडून मदत मिळावी याकरीता नगर पालिकेने प्रयत्न सुरु केले.

त्यासाठी  नगराध्यक्षा रेखाताई  श्रीराम बांगर, उपाध्यक्ष  अ.माबुद बागवान व नगर परिषद गटनेते श्रीराम बांगर यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना पालिका  प्रशासनाला दिल्या  होत्या. त्यानुसार  मुख्याधिकारी प्रांजली  मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन मयत कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी ५० लाख  रुपयाच्या  आर्थिक मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  सादर  करण्यात  आला आहे.  त्यामुळे  या दोन्ही  कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांना लवकरच आर्थिक मदत मिळणार आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला बदली

हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला बदली

Hingoli Municipal Council: नगर परिषद प्रशासन संचालनालय ३० ऑक्टोंबरला काढलेल्या आदेशात हिंगोली नगर पालिकेचे नगर अभियंता प्रतिक नाईक यांची वाशिमला पदोन्नतीवर बदली झाली आहे..

Nov 01, 2026
हिंगोली जळीतकांडातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

हिंगोली जळीतकांडातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

हिंगोली जळीतकांडातील तिघांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत. आमदार संतोष बांगर आणि श्रीराम बांगर यांच्या हस्ते रक्कम सुपूर्द.

Oct 31, 2026
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नळ दुरुस्तीचे आवाहन; अन्यथा नळजोडणी खंडित होणार- नगरपरिषद हिंगोली

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नळ दुरुस्तीचे आवाहन; अन्यथा नळजोडणी खंडित होणार- नगरपरिषद हिंगोली

Hingoli Municipal Council: हिंगोली शहरातील सर्व घरगुती नळधारकांना नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या घरातील नळांमधून पाण्याची गळती होत असल्यास संबंधित नळांची तात्काळ...

Oct 27, 2026
संसद भवनाजवळच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये आग; छतावरील एसी बॉयलरजवळील टाकीने घेतला पेट

संसद भवनाजवळच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये आग; छतावरील एसी बॉयलरजवळील टाकीने घेतला पेट

नॉर्थ ब्लॉकमध्ये वेल्डिंगदरम्यान एसी बॉयलरजवळील प्लास्टिकच्या टाकीला आग; सहा अग्निशमन गाड्यांनी नियंत्रण मिळवले, जीवितहानी नाही.

Oct 26, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स. बासिद यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम युक्तीवाद पूर्ण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक स. बासिद यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर अंतिम युक्तीवाद पूर्ण

Hingoli Municipal Council: हिंगोली नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रभाग क्रमांक १४-ब मधील नगरसेवक सय्यद बासित सय्यद हबीब यांना चार अपत्ये असल्याच्या आरोपा वरून त्यांचे नगरसेवक..

Oct 13, 2026