Hingoli Meeratai Kadam: सामाजिक आणि समुदाय विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हिंगोली येथील सेवासदन परिवाराच्या मीराताई धनराज कदम यांना तमिळनाडूच्या मदुराई येथील प्रतिष्ठित धान फाउंडेशन..
हिंगोली (Hingoli Meeratai Kadam) : सामाजिक आणि समुदाय विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हिंगोली येथील सेवासदन परिवाराच्या मीराताई धनराज कदम यांना तमिळनाडूच्या मदुराई येथील प्रतिष्ठित धान फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा कलंजीयम म्युच्युअल मुव्हमेंट कम्युनिटी अवॉर्ड जाहीर झाला आहे. ही हिंगोलीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून चार राज्यांमधून या पुरस्कारासाठी मीराताईंची निवड करण्यात आली आहे. तमिळनाडू राज्यातील धान फाउंडेशनने त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची विशेष दखल घेतली आहे.
या पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना मीराताईंनी (Hingoli Meeratai Kadam) सांगितले की, "हा पुरस्कार माझा एकटीचा नसून आपल्या सर्वांचा आहे. माझे सर्व चिमुकले, सेवासदन परिवाराशी जुळलेले आपण सर्व आणि माझे कुटुंब या सर्वांना मी हा पुरस्कार समर्पित करते."
या मानाच्या पुरस्काराचे वितरण आज २ ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे होणार आहे. या गौरवशाली कामगिरीबद्दल मीराताई कदम आणि धनराज कदम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.