हिंगोली महाविकास आघाडी

मराठवाड्यातील पदवीधरांनी भाकरी फिरवली...

Hingoli Maha Vikas Aghadi: मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. प्रतापसिंह पाटील हे विक्रमी मतांनी विजयी झाले. सलग तीनवेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व..

मराठवाड्यातील पदवीधरांनी भाकरी फिरवली...

Hingoli Maha Vikas Aghadi

 

महाविकास आघाडीचे डॉ. प्रतापसिंह पाटील विजयी; सतिष चव्हाणांचा १८ वर्षानंतर पराभव

हिंगोली (Hingoli Maha Vikas Aghadi) : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. प्रतापसिंह पाटील हे विक्रमी मतांनी विजयी झाले. सलग तीनवेळा या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिष चव्हाण  यांचा या निवडणूकीत पराभव झाला. 

अभियांत्रीकी विषयाचे स्नातक असलेले सतिष चव्हाण हे २००८ पासून मराठवाडा पदवीधर मतदार संघात निवडूण येत होते. पक्षाच्या फाळणीनंतर त्यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणे पसंत केले. या निवडणूकीत महाविकास आघाडीतर्फे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी दिली. परभणी येथील शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम डॉ. वेदप्रकाश पाटील यांचे चिरंजीव असलेले डॉ. प्रतापसिंह पाटील हे सबंध मराठवाड्याला चांगले परिचित आहेत. नियोजनबध्द प्रचार व हाताशी असलेली मोठी यंत्रणा त्यांना एकीकडे कामी आली. दुसरीकडे सलग तीनवेळा आमदार असलेल्या सतिष चव्हाणांचा मतदारांशी तुटलेला संपर्क त्यांना भोवला. 

२५ ऑक्टोंबर रोजी पदवीधर निवडणूकीचे मतदान झाले. २७ ऑक्टोंबरला छत्रपती संभाजीनगर मध्ये सकाळपासून मतमोजणी सुरूवात करण्यात आली होती. २४ तासांपासून  सुरू असलेल्या मतमोजणीत प्रामुख्याने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापसिंह पाटील यांनी चांगलीच आघाडी घेतली होती. त्यांची प्रत्येक फेर्‍यामध्ये ही आघाडी कायम होती. निवडणूकीत पसंती क्रमांनूसार मतमोजणी दरम्यान विजयासाठी आवश्यक ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित ठरविण्यात आला होता. 

अंतीम निकाल जरी हाती आला नसला तरी प्रतापसिंह पाटील यांचा विजय मात्र निश्चित झाला होता. त्यांच्या विजयाचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या निवडणूकीत उबाठा  शिवसेनेच्या दिलीप घुगे यांनी उमेदवारी दाखल केली होती.  या निवडणूकीत ते तिसर्‍या क्रमांकावर राहीले.

सतिष चव्हाण यांच्या विजयाचाच होता बोलबाला
महायुतीचे उमेदवार सतिष चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून जिल्ह्यात त्यांच्या हितचिंतकांनी अनेक पदवीधरांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मतदानाच्या दिवसापर्यंत सतत संपर्कात असताना त्यांच्या एका एका मतासाठी हितचिंतकांनी जीवाचे रान केले. हिंगोली जिल्ह्यात सतिष चव्हाण यांचा नियोजनबध्द प्रचार असल्याने त्यांच्याच विजयाचा बोलबाला अधिक होता. परंतु प्रत्यक्षात २७ ऑक्टोंबरपासून सुरू झालेल्या मतमोजणीत सतिष चव्हाण हे पिछाडीवर होते. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या हितचिंतकांना हा फार मोठा धक्का बसला आहे.