Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

तिखाडी जुगार छापा

तिखाडी येथील झन्ना मन्ना जुगारावर छापा; दहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

Tikhadi Gambling Raid: तालुक्यातील तिखाडी येथे बासंबा पोलिसांनी झन्ना मन्ना जुगारावर छापा मारून १० जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १८ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले आहेत.


तिखाडी येथील झन्ना मन्ना जुगारावर छापा दहा जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

Tikhadi Gambling Raid |

हिंगोली (Tikhadi Gambling Raid) : तालुक्यातील तिखाडी येथे बासंबा पोलिसांनी झन्ना मन्ना जुगारावर छापा मारून १० जुगार्‍यांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १८ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी अवैध धंद्या विरूध्द आक्रमक धोरण स्विकारले आहे. त्यातच आता २० ऑगस्ट गुरूवार रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे हिंगोलीच्या दौर्‍यावर येत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा अर्लट झाली आहे.

तिखाडी येथे  राजू पवार यांच्या टिनपत्राच्या समोरील रस्त्यावर झन्ना मन्ना जुगार सुरू असल्याची माहिती बासंबा पोलिसांना १८ ऑगस्टला मिळाली. रात्री १०. ४० वाजता पोलिस पथकाने छापा मारला. या ठिकाणी नगदी १८ हजार ७४० रुपये जप्त करण्यात आले.

या (Tikhadi Gambling Raid) प्रकरणी बासंबा पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक सुखदेव वाठोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश परसराम पवार, गोपाल अंबादास आडे, साहेबराव मोहन राठोड, संतोष सुभाष राठोड, वैभव मारोती ठोके, संतोष वसराम राठोड, गोपिचंद बाबुराव चव्हाण, सचिन सुभाषराव मस्के सर्व रा. तिखाडी, नारायण केवा जाधव रा. बोरजा, उध्दव पतींगराव मस्के रा. वर्‍हाडी या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या जुगार्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कलम ३५ (३) प्रमाणे नोटीस देऊन जागेवरच सोडले.

Related to this topic: