Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली रुग्णालय रक्षाबंधन

जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; डॉक्टर, कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

Hingoli Hospital Raksha Bandhan: महिला पतंजली योग समिती व लोकसेवा मंडळ रुग्ण मित्र यांच्या संयुक्त सहकार्याने शासकीय जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन


जिल्हा रुग्णालयात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम डॉक्टर कर्मचारी व सफाई कामगारांना बांधल्या राख्या

Hingoli Hospital Raksha Bandhan |

हिंगोली (Hingoli Hospital Raksha Bandhan) : महिला पतंजली योग समिती व लोकसेवा मंडळ रुग्ण मित्र यांच्या संयुक्त सहकार्याने शासकीय जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समितीच्या महिला भगिनींनी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कामगारांना राख्या बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

समाजात बंधुभाव, आपुलकी आणि सामाजिक एकोपा वाढावा, या उद्देशाने हा (Hingoli Hospital Raksha Bandhan) उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयातील कर्मचारी महिलांनाही राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित करण्यात आला. या उपक्रमाला रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, डॉ. कदम, डॉ. नागरे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांना राख्या बांधण्यात आल्या. रुग्णालयातील सेवाभावी वातावरणात रक्षाबंधन साजरे झाल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

महिला पतंजली योग समितीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात योगासोबतच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. राज्य कार्यकारिणी सदस्य माधुरीताई शास्त्री व जिल्हा प्रभारी ज्योतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनातून समाजसेवेचे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे. या (Hingoli Hospital Raksha Bandhan) रक्षाबंधन कार्यक्रमास संवाद प्रभारी पूजा चौरसिया, यज्ञ प्रभारी शीतल बोरकर, सुषमाताई होकरणे, मंगलताई काळे, कांदेताई, दारवेकर ताई, जगताप ताई,हनवतेताई, लक्ष्मीताई, कुमारी आराध्या, मारुताई यांच्यासह महिला पतंजली योग समितीच्या भगिनींची प्रमुख उपस्थिती होती.

रक्षाबंधनाच्या (Hingoli Hospital Raksha Bandhan) माध्यमातून केवळ बहीण-भावाचे नाते दृढ करण्याऐवजी समाजातील प्रत्येक घटकांमध्ये प्रेम, विश्वास, माणुसकी आणि आपुलकीची भावना निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. जिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि सफाई कामगारांच्या कार्याचा सन्मान राखी बांधून करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

Related to this topic: