Hingoli Fire Incident

हिंगोली जळीतकांडातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

हिंगोली जळीतकांडातील तिघांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत. आमदार संतोष बांगर आणि श्रीराम बांगर यांच्या हस्ते रक्कम सुपूर्द.

हिंगोली जळीतकांडातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

Hingoli Fire Incident

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या आर्थिक मदतीचे ३१ ऑक्टोबर रोजी वितरण; श्रीराम बांगर यांची उपस्थिती

हिंगोली शहरातील फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत जीव गमावलेल्या तिघांच्या कुटुंबीयांना अखेर आर्थिक मदतीचा आधार मिळाला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीचे ३१ ऑक्टोबर, शनिवारी वितरण करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर आणि हिंगोली नगर परिषदेचे गटनेते श्रीराम बांगर यांच्या हस्ते मृतांच्या वारसांकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.

हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात ५ ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. विजयकुमार बासटवार यांच्या निवासस्थानी साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या गोदामाला अचानक भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अविनाश बांगर यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.

या दुर्घटनेत अनेकजण गंभीररीत्या भाजले होते. त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके आणि आकाश सांगळे यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या आगीत मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झाली होती.

या दुर्घटनेत कुटुंबातील सदस्य गमावलेल्या वारसांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार ३१ ऑक्टोबर रोजी आमदार संतोष बांगर आणि नगर परिषद गटनेते श्रीराम बांगर यांच्या वतीने संबंधित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, शिवसेनेचे नगरसेवक सुभाष बांगर, गणेश बांगर, रत्नाकर बांगर, सुमित कांबळे, विशाल गोटरे, रामकिशन बांगर, कंत्राटदार संतोष आर. बांगर, संदीप बांगर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या आर्थिक मदतीमुळे हिंगोलीतील जळीतकांडात आपल्या कुटुंबातील सदस्य गमावलेल्या तीनही कुटुंबांना कठीण परिस्थितीत आर्थिक आधार मिळणार आहे.

संबंधित सामग्री

राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंना धक्का देणारी खेळी! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते मनसेत दाखल

राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंना धक्का देणारी खेळी! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते मनसेत दाखल

राज ठाकरेंच्या मनसेला दक्षिण रत्नागिरीत मोठे बळ! छावा संघटनेचे ३५० कार्यकर्ते आणि शिंदे गटातील पदाधिकारी मनसेत दाखल.

Nov 16, 2026
मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

मोफत वीज कागदावरच; शेतकरी मात्र अंधारात!

Farmers Free Electricity Scheme: शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सरकारकडून मोठ्या दिमाखात केली जात असली, तरी प्रत्यक्षात अपुरा वीजपुरवठा आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nov 16, 2026
अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान; 'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा!

अमित शाहांच्या पुणे दौऱ्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? संजय शिरसाटांचे मोठे विधान; 'ऑपरेशन टायगर'चीही चर्चा!

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात राजकीय घडामोडींचे संकेत! विलिनीकरण आणि ऑपरेशन टायगरवर संजय शिरसाटांचे मोठे विधान.

Nov 16, 2026
पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

पुण्यात अमित शाहांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ! सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदेंची भेट; शिवसेनेच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत चर्चांना वेग.