हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय

हिंगोली न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Hingoli District and Sessions Court: जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा २ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास न्यायालयाच्या इमेलवर  आला. त्यानंतर ही माहिती तात्काळ पोलिस..

हिंगोली न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Hingoli District and Sessions Court

 

श्वानासह बॉम्ब शोधक व नाशक पथकाने इमारतीची केली संपूर्ण पाहणी

हिंगोली (Hingoli District and Sessions Court) : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा २ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास न्यायालयाच्या इमेलवर  आला. त्यानंतर ही माहिती तात्काळ पोलिस प्रशासनाला दिल्यानंतर श्वानासह बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन संपूर्ण इमारतीची पाहणी केली. परंतु कुठेही आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याने सुटकेचा निश्वास सोडला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे (Hingoli District and Sessions Court) कामकाज २  नोव्हेंबर सोमवार रोजी नेहमीसारखे सुरळीत चालू झाले आहेत. सकाळी ११.०५ न्यायालयाच्या पोर्टलवर आय ईडी बॉम्ब स्फोटाने न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. या बाबतची माहिती न्यायालयाने तात्काळ जिल्हा पोलिस यंत्रणेला देताच प्रभारी पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी श्वानासह बॉम्ब शोधक व नाशक पथकाला घटनास्थळी रवाना केले. या पथकाने संपूर्ण इमारतीच्या चारही मजल्यावर जाऊन तपासणी केली. विशेष म्हणजे ही इमारत दुपारी ३ वाजून ११ मिनीटाला उडवून दिली जाईल असा उल्लेख केला होता. 

त्यामुळे खबरदारीच्या दृष्टीने न्यायालयाने दिलेल्या सुचनेनंतर संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली. त्यानंतर या इमारतीचा ताबा पोलिसांच्या पथकाने घेतला. आलेला इमेल कोणी पाठविला. तसेच कोणाच्या ई मेलवरून आला या बाबतची माहिती पोलिसांच्या सायबर सेलतर्फे घेतली जात आहे.

घटनास्थळी प्रभारी पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे, सायबर सेलचे सपोनि वसंत आरसेवार, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे नागरे, ताहेर शेख अभिजीत हलगे, रवि गंगावणे, रोहीत मुदिराज, गंगाधर राऊत, पांडुरंग ठाकरे, प्रबुध्द सोनकांबळे, गजानन निर्मले, संजय तोडेवाले, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सुनिल अंभोरे, अशोक धामणे, दिलीप लेकुळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के यांच्या पथकाने इमारत स्थळी तळ ठोकला होता. या बॉम्बच्या भितीने मात्र न्यायालयात गोंधळ उडाला होता.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात भर दिवसा चोरी

Hingoli District and Sessions Court: जिल्ह्यात चोर्‍यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आता तर चोरट्यांना पोलिसांचे भय वाटेनासे झाले आहे. हिंगोलीतील जिल्हा व सत्र न्यायालयात चोरी

Sep 30, 2026