हिंगोली शहर विकास

शिवसेना नगराध्यक्ष व उपाध्यक्षांना दिले शहर विकासाचे धडे

Hingoli City Development: महाराष्ट्रातील शिवसेनेचे नगर पालिकेतील अध्यक्ष, उपाध्यक्षांना केशव सृष्टीतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी उत्तन येथे प्रशिक्षणाच्या माध्यमातून शहर विकासाचे धडे देण्यात आले. 

शिवसेना नगराध्यक्ष व उपाध्यक्षांना दिले शहर विकासाचे धडे

Hingoli City Development

हिंगोली (Hingoli City Development) : महाराष्ट्रातील शिवसेनेचे नगर पालिकेतील अध्यक्ष, उपाध्यक्षांना केशव सृष्टीतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी उत्तन येथे प्रशिक्षणाच्या माध्यमातून शहर विकासाचे धडे देण्यात आले. 

शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे राज्य संघटना प्रमुख खा. डॉ. आनंद परांजपे यांच्या वतीने महाराष्ट्रातील नगर परिषद, नगर पंचायत मधील शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून शहर विकासाचे धडे देण्यात आले. ज्या उद्देशाने नागरीकांनी शिवसेना नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना निवडून दिले. त्याच उद्देशाने जनतेची कामे कशा पध्दतीने हाताळली जावे व शहर विकासाला कशी गती द्यावी याबाबत उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यामध्ये समारोपीय प्रशिक्षणाला उद्योगमंत्री उदय सामंत तर समारोपीय प्रशिक्षणात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी वित्तीय विभागाचे सेवानिवृत्त विभागीय सचिव यु.टी. महाजन यांच्यासह उपस्थित मंडळांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना मार्गदर्शन केले. 

या (Hingoli City Development) प्रशिक्षणात हिंगोलीच्या नगराध्यक्षा सौ. रेखाताई बांगर, गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष अ.माबुद बागवान, कळमनुरीच्या नगराध्यक्षा सौ. अश्लेषा चौधरी, आर.आर. पाटील, उपाध्यक्ष शिवराज पाटील, औंढा नागनाथ नगर पंचायतीचे अध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख यांनीही प्रशिक्षणात सहभाग नोंदवला.