प्रकरण हिंगोली पोलिसांकडे दाखल
हिंगोली (Hingoli Church Land Case) : शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या जमिनीच्या खरेदी विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत याबाबत शहर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याचे पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी कळविले आहे.
हिंगोली शहरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या भूखंड क्रमांक ७९ मधील ३० गुंठे जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार सध्या प्रशासनाची डोकेदुखी बनला आहे १९६७ सङङङ खरेदी केलेल्या या जमिनीवर त्याच काळात प्लॉटिंग करण्यात आली होती शासन नियमानुसार मंजूर झालेल्या या प्लॉट्स ची विक्री होऊन प्लॉटनिहाय मालमत्ता पत्रक पी आर कार्ड तयार होत गेले परंतु सातबारावर याबाबत नोंदी झाल्या नाहीत एकूण सहा एकर १६ गुंठे जमिनीतील शिल्लक तीस गुंठे जमीन प्रकरणी न्यायालयाने जमीन मालकाच्या बाजूने निर्णय दिला.
या (Hingoli Church Land Case) निर्णया आधारे जमीन मालकाच्या वारसदारांनी ही जमीन मागील आठवड्यात विकली या व्यवहारात जमिनीची चतुर सीमा जी दाखविण्यात आली तीच मुळात चुकीची असल्याचे शास्त्रीनगर भागातील रहिवाशांचे म्हणणे आहे याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकार्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत वास्तविक दस्त नोंदणी विभागाच्या अधिकार्यांनी दक्षता न घेतल्यामुळे हा व्यवहार पूर्ण झाला ज्या मालमत्तेचे शहर भूमापन विभागाकडे मालमत्ता पत्रक तयार होते ती मालमत्ता सातबारा वरून कमी करावयाची असते शिवाय या व्यवहारात भरण्यात आलेला महसूलही कमी भरला गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
या (Hingoli Church Land Case) प्रकरणात मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पुन्हा एक बैठक घेण्यात आली यामध्ये महसूल विभाग शहर भूमापन विभाग दस्त नोंदणी कार्यालय नगरपरिषद अशा सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते झालेला प्रकार बेकायदेशीर असल्याचा मत बनल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दस्त नोंदणी विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले यावरून शहर पोलीस ठाण्यात सह दुय्यम निबंधक आर बी खाटपे यांनी 150 पानांची तक्रार दिली आहे. या तक्रारीतील सर्व बाजू तपासून जे दोषी ठरतील अशा सर्व लोकांवर 7 दिवसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवेंद्र सिंग ठाकूर यांनी दिली आहे.