Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

खासदार श्रीकांत शिंदे

हिंगोलीतील कावड यात्रेत खासदार श्रीकांत शिंदेंकडून ज्येष्ठ नगरसेवक सुभाष बांगर यांचे कौतुक

MP Shrikant Shinde: आमदार संतोष बांगर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना नगरसेवक सुभाष बांगर यांच्या कौटुंबिक यशाची ओळख करून दिली.


हिंगोलीतील कावड यात्रेत खासदार श्रीकांत शिंदेंकडून ज्येष्ठ नगरसेवक सुभाष बांगर यांचे कौतुक

MP Shrikant Shinde |

 

सुभाष बांगर यांचा मुलगा आणि सून दोघेही ‘एसपी’ असल्याचा अभिमान

हिंगोली (MP Shrikant Shinde) : कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात भव्य कावड यात्रा काढण्यात आली. श्री क्षेत्र चिंचाळे महादेव मंदिर येथून भक्तिभावाने निघालेली ही कावड यात्रा हिंगोली शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत गांधी चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

​या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर खासदार तथा शिवसेना गटनेते श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यात हिंगोली नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष बांगर यांच्या हस्ते खासदार श्रीकांत शिंदे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. ​सत्कार सोहळ्या दरम्यान आमदार संतोष बांगर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना नगरसेवक सुभाष बांगर यांच्या कौटुंबिक यशाची ओळख करून दिली. "नगरसेवक सुभाष बांगर यांचा मुलगा वैभव सुभाषराव बांगर हे सध्या वाराणसी येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांची सून नीतू वैभव बांगर यादेखील वाराणसी येथेच अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत," अशी माहिती आमदार बांगर यांनी दिली.

​एकाच घरातील मुलगा आणि सून दोघेही उच्चपदस्थ पोलीस अधिकारी (एसपी) म्हणून देशसेवा करत असल्याचे ऐकून खासदार श्रीकांत शिंदे यांनी नगरसेवक सुभाष बांगर यांचे विशेष कौतुक केले व बांगर कुटुंबाचा गौरव केला. या प्रसंगी शहरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.