Hingoli Ailing student: महादेव माळीराम स्मारक प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वी चा विद्यार्थी साई सखाराम पाटोळे याच्या अन्ननलिकेची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
हिंगोली (Hingoli Ailing student) : येथील महादेव माळीराम स्मारक प्राथमिक शाळेतील इयत्ता ७ वी चा विद्यार्थी साई सखाराम पाटोळे याच्या अन्ननलिकेची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या विद्यार्थ्याच्या वैद्यकीय उपचारासाठी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला. संस्थेच्यावतीने व शाळेतील शिक्षकवृंदांनी मिळून १३ हजार रुपयांचे अर्थसाह्य केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे. एम. मंत्री यांनीही वैयक्तिक आर्थिक मदत केली आहे.
स्वातंत्र्यदिनी शाळेत झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे सहसचिव जयकुमार संघई, विश्वस्त अॅड. किरण नर्सीकर व मुख्याध्यापिका तृप्ती सताळकर यांच्या हस्ते साई याला गणवेश व अर्थसाह्याची रक्कम देण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साई लवकर बरा होऊन पुन्हा शाळेत उत्साहाने सहभागी व्हावा, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.