Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली शेतकरी कर्जमाफी

हिंगोलीत ४३ हजार ५२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण

Hingoli Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ८९ हजार ७६९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.


हिंगोलीत ४३ हजार ५२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण

Hingoli Farmer Loan Waiver |

हिंगोली (Hingoli Farmer Loan Waiver) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ८९ हजार ७६९ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. यापैकी ४३ हजार ५२५ शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांपैकी ३३ हजार ९२६ लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले असून ९ हजार ५९९ लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा निबंधक सुरेखा फुफाटे यांनी दिली.

योजनेच्या जिल्हास्तरीय प्रक्रियेंतर्गत कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची निश्चिती करण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण  करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. (Hingoli Farmer Loan Waiver) योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार  विभागाकडून कार्यवाही सुरू असल्याचेही जिल्हा निबंधक सुरेखा फुफाटे  यांनी सांगितले.

Related to this topic: