Hingoli Accident

नरवाडी शिवारात भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्ग (NH-161) वरील नरवाडी फाट्याजवळ शुक्रवारी (१९ जून) सायंकाळी भीषण अपघात झाला.

नरवाडी शिवारात भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Hingoli Accident

NH-161 हिंगोली-नांदेड महामार्गावरील नरवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाची धडक

आखाडा बाळापूर (Hingoli Accident) : हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्ग (NH-161) वरील नरवाडी फाट्याजवळ शुक्रवारी (१९ जून) सायंकाळी भीषण अपघात झाला. कळमनुरीहून येलकीकडे दुचाकीवरून जात असलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन लक्ष्मणराव पतंगे (वय ५०) आणि पंजाबराव माधवराव पतंगे (वय ६५), दोघेही रा. येलकी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली हे MH-38 AF-7730 क्रमांकाच्या दुचाकीवरून कळमनुरीहून येलकीकडे जात होते. नरवाडी फाट्याजवळ पोहोचताच अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकी रस्त्यावर कोसळली. अपघातात चालक गजानन पतंगे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पंजाबराव पतंगे यांच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेषराव पोले, सय्यद तयब अली, वाघमारे आणि गजानन आगलावे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमी पंजाबराव पतंगे यांना NHAI जारोडा टोल येथील रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ आखाडा बाळापूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी आखाडा बाळापूर बिटचे प्रमुख राजेश घोंगडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

संबंधित सामग्री

भरधाव मालवाहू वाहनाची दोघांना जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर!

भरधाव मालवाहू वाहनाची दोघांना जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर!

मानोरा-मंगरूळपीर महामार्गावर मालवाहू वाहनाच्या धडकेत अजय चौधरी यांचा मृत्यू, तर प्रकाश लांडे गंभीर जखमी. अपघात २ नोव्हेंबर रोजी घडला.

Nov 03, 2026
आरोग्य सेवेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य सेवेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

Akhada Balapur Rural Hospital: ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर..

Nov 02, 2026
टेकाडी गुरुद्वाराजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

टेकाडी गुरुद्वाराजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

टेकाडी गुरुद्वाराजवळ ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे जखमी. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार, कन्हान पोलिसांत गुन्हा दाखल.

Oct 31, 2026
परभणीत बस-दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

परभणीत बस-दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

Parbhani Bus-Bike Accident: पाथरी तालुक्यातील राज्य महामार्ग क्र.६१ वर पोहेटाकळी शिवारात झालेल्या बस-दुचाकीच्या भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मयत दोघे मध्यप्रदेशातील रहिवाशी आहेत.

Oct 28, 2026
परभणीत कर्तव्यावरून घरी परतणाऱ्या होमगार्डचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

परभणीत कर्तव्यावरून घरी परतणाऱ्या होमगार्डचा अपघाती मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

परभणीतील इसाद रोडवरील फुलमळा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत होमगार्ड दशरथ टोले आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू; होमगार्ड बालाजी गाडे जखमी.

Oct 17, 2026