यशस्वी सापळा कारवाई : खिल्लारच्या तलाठ्याला 14 हजारांची लाच घेताना अटक

हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात गुरुवार, 5 जून 2026 रोजी ही सापळा कारवाई यशस्वी करण्यात आली. 

यशस्वी सापळा कारवाई : खिल्लारच्या तलाठ्याला 14 हजारांची लाच घेताना अटक

Hingoli ACB Trap

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी

हिंगोली (Hingoli ACB Trap) : वडिलोपार्जित शेतीच्या फेरफार करून सातबारावर नाव लावण्यासाठी 22 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खिल्लार सज्जाच्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 14 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात गुरुवार, 5 जून 2026 रोजी ही सापळा कारवाई यशस्वी करण्यात आली. 

सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील 25 वर्षीय तक्रारदाराच्या वडिलांना हक्कसोड वाटणीतून 5 एकर वडिलोपार्जित शेती मिळाली होती. या शेतीचा फेरफार करून सातबारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी सज्जा खिल्लारचे तलाठी रामेश्वर अर्जुन रोडगे, वय 43 यांनी 2 जून 2026 रोजी तक्रारदाराकडे 22 हजार रुपयांची मागणी केली होती. नाईलाजाने तक्रारदाराने त्याच दिवशी 8 हजार रुपये दिले. उर्वरित 14 हजार रुपये दिल्याशिवाय काम करणार नाही असे तलाठ्याने सांगितले होते. 

या संदर्भात तक्रारदाराने 5 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली कार्यालयात तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी त्याच दिवशी सेनगाव येथे पडताळणी करण्यात आली. पंचासमक्ष झालेल्या भेटीत तलाठी रोडगे यांनी यापूर्वी 8 हजार रुपये घेतल्याचे मान्य केले आणि उर्वरित 14 हजार रुपयांची मागणी करून आजच रक्कम स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले. 

पडताळणीनंतर तातडीने सापळा रचण्यात आला. सायंकाळी हिंगोली-सेनगाव रोडवरील पुसेगाव फाटा परिसरात आरोपी तलाठी रामेश्वर रोडगे याने तक्रारदाराकडून पंचासमक्ष 14 हजार रुपये लाच स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. 

आरोपीच्या अंगझडतीत आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय ओळखपत्र, एसबीआय बँकेची 2 एटीएम कार्ड, व्हिवो कंपनीचा मोबाईल आणि 6,750 रुपये रोख रक्कम आढळून आली. मोबाईल हॅन्डसेट तपासणीनंतर आवश्यकतेनुसार जप्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

या प्रकरणी नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 च्या कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीस अटक केली जाणार आहे. 

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुलभा राऊत करीत आहेत.

संबंधित सामग्री

अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार

अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट; प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीज भेट मिळणार. २ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ; ४२.८१ कोटींचा निधी.

Oct 14, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 5 हजार रुपये

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार 5 हजार रुपये

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये मिळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू.

Oct 14, 2026
UPI पेमेंटवरील MDR शुल्क लांबणीवर! दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंमलबजावणी; व्यापाऱ्यांना दिलासा

UPI पेमेंटवरील MDR शुल्क लांबणीवर! दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अंमलबजावणी; व्यापाऱ्यांना दिलासा

UPI MDR शुल्काची अंमलबजावणी दिवाळीनंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार. ₹२,००० पेक्षा जास्त निवडक व्यापारी व्यवहारांवरील शुल्काबाबत NPCI चा निर्णय.

Oct 13, 2026
अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम! रोहित-विराटसह सर्वांना टाकले मागे

अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम! रोहित-विराटसह सर्वांना टाकले मागे

Abhishek Sharma: भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा भारतीय विक्रम प्रस्थापित केला. वेस्ट इंडिजविरुद्ध इंदूर येथे..

Oct 12, 2026
अ‍ॅमेझॉनचा 1,000 कर्मचाऱ्यांना धक्का! भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील नोकऱ्यांवर परिणाम

अ‍ॅमेझॉनचा 1,000 कर्मचाऱ्यांना धक्का! भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील नोकऱ्यांवर परिणाम

Amazon Layoffs: अ‍ॅमेझॉनमध्ये सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांची कपात. भारत, अमेरिका आणि ब्रिटनमधील कर्मचाऱ्यांवर परिणाम झाल्याचे वृत्त.

Oct 09, 2026