Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महा-उपोसथ च धम्म दिवस

वास्तविकता दुःखातून मुक्ती हवी असेल तर पंचशीलाचे पालन करणे गरजेचे: डॉ. विनय रक्खिता महास्थवीर

Maha-Uposatha Dhamma Day:


वास्तविकता दुःखातून मुक्ती हवी असेल तर पंचशीलाचे पालन करणे गरजेचे डॉ विनय रक्खिता महास्थवीर

Maha-Uposatha Dhamma Day |

हिंगोली  (Maha-Uposatha Dhamma Day) : येथील निर्वाना फाउंडेशन च्या वतीने महा- उपोसथ च धम्म दिवस कार्यक्रमाचे आयोजन 30 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. यावेळी विपश्यनाचार्य डॉ. विनय रखीता महाथेरो नागपुर यांच्या उपस्थितीत महा उपोसथ धम्मदिवस साजरा करण्यात आला मागील तीन वर्षापासून हा उपक्रम आयोजित केला जातो. यावेळी हिंगोली शहरासह जिल्ह्यातून  उपासिक -उपासीका यांनी  पांढरे शुभ्रवस्त्र  परिधान करून व उपोसथवृत राखत  बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मं शरणं गच्छामि यांच्यासह पंचशीलाचे पालन केले तर दुःखातून मुक्ती प्राप्त होऊन जीवनात अमुलाग्र बदल घडविल्याची ताकत निर्माण होते. एकाग्रता मन विधीने मन स्थिर राहून अंगातील विकार नष्ट केल्या जातात असेही पू. भदंत विनय रक्खिता महास्थवीर नागपूर  व भन्ते पय्यावर्धन हिंगोली यांनी सांगितले.

 हिंगोली शहरातील शिवलीला लॉन्स हिंगोली अकोला रोडवर असलेल्या सभागृहात (Maha-Uposatha Dhamma Day) महा उपोसथ धम्मदिवस  हा कार्यक्रम 30 ऑगस्ट रोजी घेण्यात आला.यावेळी तथागत  भगवान बुद्धांनी  आपल्याला केवळ दीर्घायुष्याची अपेक्षा न करता सदाचारपूर्ण आणि धम्ममय जीवन जगण्याची प्रेरणा दिली आहे. मनुष्याचे जीवन त्याच्या वयाने नव्हे, तर त्याच्या आचरणाने मौल्यवान ठरते. शीलाचे पालन केल्याने जीवनात संयम निर्माण होतो,आणि मनाची अस्वस्थता कमी होते, आणि  व्यक्तीच्या आचरणातून समाजालाही सकारात्मक दिशा मिळते.पुण्य अर्जित करण्याच्या दृष्टीनेही त्रिशरण पंचशीलचे पालन करणे गरजेचे आहे असे  पू. भदंत विपश्यनाचार्य विनय रक्खिता महास्थवीर नागपुर यांनी धम्मदेशना कार्यक्रमात सांगितले.

यावेळी हिंगोली शहरातील पूज्य भदंत पय्यावर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली (Maha-Uposatha Dhamma Day) महा- उपोसथ धम्मदिवसामध्ये शिलग्रहण , त्रिरत्न वंदना, धम्मदेशना, साधना,धम्मदान, बुद्धपूजा , पुण्यानुमोदन, प्रश्नोत्तर, ग्रंथपथन धम्मचर्चा, शीलपवारण असे विविध विषयावर धम्मचर्चा  मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी मोठ्या संख्येने  उपासक- उपासिकाचा सहभाग होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निर्वाणा फाउंडेशनचे सुनील अंभोरे,शांतिरत्न थोरात, इंजि.  धनंजय भगत, स्वप्निल गायकवाड, ॲड.  सुनील कांबळे, वैभव खिल्लारे, आकाश खिल्लारे,  संदिप डोंगरे,  कुलदिप कांबळे, सुनिल इंगोले, अजय जावळे, दिपाली पुंडगे. नंदकिशोर कांबळे,संतोष चाटसे आदींनी परिश्रम घेतले.