हिंगोली (Hi Diwali Balirajachya Ghari) : सध्याची दुष्काळजन्य, परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील आत्महत्येचे वाढते प्रमाण या सर्व गोष्टी मन उद्विग्न करणार्या आहेत. आपण सर्वजण शेतकर्यांची लेकरं आहोत. आपल्या ताटात जो रोजचा घास येतो तो बळीराजाच्या मेहनतीचा आहे. पण आज मात्र त्याच्याच कुटुंबावर संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, निराधार कुटुंब, दिव्यांग कुटुंब, शहीद जवानांचे कुटुंब यांच्या कुटुंबाचा विचार आपण आपली दिवाळी साजरी करत असताना करणे गरजेचे आहे.
याच भावनेतून सेवासदन परिवाराचे धनराज कदम आणि मीरा कदम यांनी 'ही दिवाळी बळीराजाच्या घरी' हा उपक्रम या दिवाळीत राबवण्याचे ठरवले आहे. ज्या कुटुंबामध्ये यावर्षी दिवाळी साजरी करण्यास अडचण येणार आहे अशा काही कुटुंबात लोकसभागातून दिवाळी साजरी करण्याचा त्यांचा संकल्प आहे. या (Hi Diwali Balirajachya Ghari) उपक्रमांतर्गत या कुटुंबास साखर ,तेल, हरभरा डाळ, रवा, गुलाब जामुन पाकीट, शेंगदाणे, लाल तिखट ,चिवडा मसाला, मुरमुरे ,फरसाण साबण , उटणे, रांगोळी, पणत्या आणि साडी चोळी अशी कीट देऊन या कुटुंबात दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. ही किट साधारणपणे ३५०० रु किमतीची असेल. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येण्याचे आवाहन मीरा कदम आणि धनराज कदम यांनी केले आहे.
ही दिवाळी बळीराजाच्या घरी
‘ही दिवाळी बळीराजाच्या घरी’ सेवासदन परिवाराचा संकल्प
Hi Diwali Balirajachya Ghari: सध्याची दुष्काळजन्य, परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील आत्महत्येचे वाढते प्रमाण या सर्व गोष्टी मन उद्विग्न करणार्या आहेत. आपण सर्वजण शेतकर्यांची लेकरं आहोत...
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Hi Diwali Balirajachya Ghari
टैग्स:
Hi Diwali Balirajachya Ghari