Health Department

पितृछत्र हरवलेला अक्षय बनला ‘आरोग्य निर्माण अधिकारी’!

हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील पितृछत्र हरवलेला अक्षय बबन जाधव आज ‘आरोग्य निर्माण अधिकारी’ झाल्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

पितृछत्र हरवलेला अक्षय बनला ‘आरोग्य निर्माण अधिकारी’!

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर मिळविले यश; जिद्द, मेहनत आणि संघर्षाची प्रेरणादायी कहाणी

खानापूर चित्ता : हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील पितृछत्र हरवलेला अक्षय बबन जाधव आज ‘आरोग्य निर्माण अधिकारी’ झाल्याने सर्वच स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन होत आहे.

लहान वयातच, साधारणतः दहा ते बारा वर्षांचा असताना अक्षय यांनी आपल्या वडिलांचे डोक्यावरचे पितृछत्र हरवले. कुटुंबावर आलेल्या संकटांमुळे आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली. मात्र, या परिस्थितीसमोर हार न मानता शिक्षणाची कास धरत या जिद्दी तरुणाने आपले स्वप्न साकार केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्याने आपल्या आईच्या मजुरीच्या बळावर ‘आरोग्य निर्माण अधिकारी’ म्हणून यश संपादन केले आहे.

आई संगीता बबन जाधव यांनी आपल्या जीवाचे अफाट कष्ट करून मुलगा अक्षय याला शासकीय नोकरी लागावी यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मुलाला कुठल्याही गोष्टीची जाणीव होऊ न देता त्यांनी त्याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला. त्यांच्या या अफाट परिश्रमातून मुलगा अक्षय ‘आरोग्य निर्माण अधिकारी’ झाल्याने त्याच्या या यशाची परिसरात कौतुकाने चर्चा होत असून, अनेक विद्यार्थ्यांसाठी तो आज प्रेरणादायी ठरला आहे.

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी आणि परिस्थितीचे चटके या तरुणाने अगदी लहान वयातच अनुभवले. घरातील परिस्थिती बेताची असतानाही शिक्षण सोडायचे नाही, असा निर्धार त्याने केला. अनेक अडचणी आल्या, आर्थिक संकटांचा सामना करावा लागला; परंतु प्रत्येक वेळी त्याने परिस्थितीला दोष न देता अधिक मेहनत घेण्याचा मार्ग स्वीकारला.

शिक्षणाच्या जोरावर यशाची वाटचाल

शिक्षण घेत असताना अक्षयने प्राथमिक शिक्षण खानापूर चित्ता येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत, तर इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण विद्यासागर विद्यालयात घेतले. त्यानंतर डी. फार्मसी अकोला येथील गीता देवी खंडेलवाल इन्सुसट येथे संपादन केली. पुढील बी. फार्मसी शासकीय कॉलेज ऑफ फार्मसी, छत्रपती संभाजी नगर येथे पूर्ण केले. एम. फार्मसी शासकीय कॉलेज ऑफ फार्मसी, कराड, जिल्हा सातारा येथे पूर्ण करून आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय ग्रामीण रुग्णालय, हिंगोली येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यारंभ झाला आहे.

शिक्षणाचा पाया घेत असताना अनेकदा आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तरीही उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून त्याने अभ्यास सुरू ठेवला. दिवस-रात्र मेहनत, सातत्य आणि ध्येयावर असलेला विश्वास यामुळे त्याच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले. प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणानंतर सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून केलेल्या प्रयत्नांचे चीज झाले आणि आरोग्य निर्माण अधिकारी म्हणून त्याची निवड झाली.

या यशामागे त्याची स्वतःची जिद्द आणि मेहनत तर आहेच; त्याचबरोबर आई, शिक्षक आणि मार्गदर्शकांनी दिलेले प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरले. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात जिद्द आणि डोळ्यांसमोर ध्येय असेल तर यश मिळविता येते, हे त्याने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे.

विशेष म्हणजे, पितृछत्र हरवल्यानंतर निर्माण झालेल्या अडचणींना कमजोरी न बनवता त्याने त्याच परिस्थितीला आपल्या यशाची प्रेरणा बनविले. त्यामुळे त्याच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संघर्षातून यशाचा आदर्श

आज अनेक विद्यार्थी विविध कारणांमुळे शिक्षणापासून दूर जाण्याचा विचार करतात. मात्र, या तरुणाची कहाणी त्यांना वेगळा संदेश देणारी आहे. ‘परिस्थिती कधीही आपल्या स्वप्नांपेक्षा मोठी नसते’, हे त्याने आपल्या संघर्षातून दाखवून दिले आहे. पितृछत्र हरपल्यानंतरही खचून न जाता शिक्षणाच्या बळावर अधिकारी पदापर्यंत मजल मारणाऱ्या या तरुणाचे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

आरोग्य विभागात अधिकारी म्हणून काम करताना समाजातील सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे योगदान देण्याचा त्याचा मानस आहे. त्याच्या या यशामुळे खानापूर चित्ता परिसरातील तरुणांमध्येही नव्या आशेचा आणि प्रेरणेचा संचार झाला आहे.

पितृछत्र हरवले, परिस्थितीने परीक्षा घेतली; मात्र जिद्दीने हार मानली नाही. शिक्षणाच्या बळावर प्रतिकूलतेवर मात करत ‘आरोग्य निर्माण अधिकारी’ बनलेल्या या तरुणाची संघर्षगाथा अनेकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.

संबंधित सामग्री

माथाडी निरीक्षक भरतीवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नागपूरच्या एका केंद्रावरील २४ विद्यार्थी मेरिटमध्ये

माथाडी निरीक्षक भरतीवर सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप; नागपूरच्या एका केंद्रावरील २४ विद्यार्थी मेरिटमध्ये

माथाडी निरीक्षक भरतीत कथित गैरप्रकाराचा सुषमा अंधारेंचा आरोप. नागपूरच्या एका केंद्रावरील २४ उमेदवार मेरिटमध्ये; चौकशी आणि फेरपरीक्षेची मागणी.

Oct 15, 2026
मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईकरांनो, हॉटेलमध्ये जेवण महागणार! खाद्यपदार्थांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता. वाढत्या व्यावसायिक खर्चामुळे १० ते १५ टक्के दरवाढीचा विचार सुरू आहे.

Oct 15, 2026
दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

दुष्काळ आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत एसटी भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईकांनी १५ टक्के वाढीचा प्रस्ताव फेटाळला

दिवाळी २०२६ मध्ये एसटी भाडेवाढीला ब्रेक! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रस्तावित १५ टक्के हंगामी वाढ नामंजूर केली.

Oct 15, 2026
सरपंच संघटनेची पातूर तालुका कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी गणेश राठोड, उपाध्यक्षपदी नंदाताई काळे

सरपंच संघटनेची पातूर तालुका कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी गणेश राठोड, उपाध्यक्षपदी नंदाताई काळे

पातूर तालुका सरपंच संघटनेची नवीन कार्यकारिणी घोषित. अध्यक्षपदी गणेश राठोड, तर उपाध्यक्षपदी नंदाताई काळे यांची अविरोध निवड. ग्रामपंचायतींच्या विकासासाठी कार्यकारिणी प्रयत्नशील राहणार.

Oct 15, 2026
प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

Hingoli Voter List: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल..

Oct 14, 2026