मालवाहू वाहन अपघात

मालवाहू वाहनाच्या धडकेतील दोघांचाही मृत्यू!

Goods vehicle accident: तालुक्यातील आमगव्हाण येथील अजय विष्णू चौधरी व प्रकाश लांडे हे दोघेही दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शेतात हरभरा पिकात पायदळी चक्कर मारण्यासाठी गेले असताना

मालवाहू वाहनाच्या धडकेतील दोघांचाही मृत्यू!

Goods vehicle accident

मानोरा (Goods vehicle accident) : तालुक्यातील आमगव्हाण येथील अजय विष्णू चौधरी व प्रकाश लांडे हे दोघेही दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास शेतात हरभरा पिकात पायदळी चक्कर मारण्यासाठी गेले असताना मानोरा -  मंगरूळपीर राष्ट्रीय महामार्गाच्या रोडवर भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने अजय चौधरी हा ३२ वर्षीय युवक भीषण अपघातात जागीच ठार झाला तर ५२ वर्षीय प्रकाश लांडे हे गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी यवतमाळ येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मावळली. 

 मिळालेल्या माहितीनुसार, अजय चौधरी आणि प्रकाश लांडे हे दोघेही सोमवारी शेतात हरभरा पीक पाहण्यासाठी  पायदळी चक्कर मारण्यासाठी गेले असताना मंगरूळपीरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाच्या चालकाने वाहन निष्काळजीपणे  चालवत दोघांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर दोघांनाही उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, डॉक्टरांनी अजय चौधरी यांना तपासून मृत घोषित केले. तर प्रकाश लांडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. मात्र त्याच रात्री रस्त्यातच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेने आमगव्हाण गावासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

टैग्स: Goods vehicle accident