Gopalananda Saraswatiji Maharaj: देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, तरी संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कायदा लागू झालेला नाही, ही देशासाठी दुर्दैवाची बाब आहे. पूर्वीच्या काळात दहा लोकांमागे...
हिंगोली (Gopalananda Saraswatiji Maharaj) : देशाला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, तरी संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कायदा लागू झालेला नाही, ही देशासाठी दुर्दैवाची बाब आहे. पूर्वीच्या काळात दहा लोकांमागे जवळपास शंभर गाई असायच्या; आज दहा लोकांमागे एक गाय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे 100 पटीने गाई कमी झालेल्या आहेत यामुळे निसर्गाचे संतुलन बिगडले आहे रासायनिक ख़त व पेस्टीसाइड मुळे जमीनी चा पोत खराब झाला आहे गाईच्या शेन व गोमूत्रा मुळे निश्चित जमीनी सुधरतील व सर्वांना शुद्ध अन्न मिळेल असाध्य रोगापासुन सुटका मिळेल
महाराष्ट्रात दि1/12/26 रोजी तीसरे चरण बाबत महामहिम राष्ट्रपति मा पंतप्रधान महामहिम राज्यपाल मा मुख्यमंत्री यांच्या नावाने निवेदन देनार आहेत हे निवेदन देन्याकरीता प्रत्येक ग्राम पंचायत मधुन कमीत कमी 21 लोकानि यावे तसेच प्रत्येक ग्राम पंचायत मधुन कमीत कमी 2100 सह्या घेण्यात यावे. प्रत्येक ग्राम पंचायत मधे जाऊन गोमातेच महत्व सांगावे.
सभेला नागरिक, गोप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, गोरक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. यावेळी मार्गदर्शन करताना प. पू. गोपालानंद सरस्वतीजी महाराज (Gopalananda Saraswatiji Maharaj) यांनी सांगितले की, त्यामुळे गोवंशाची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून गोसंवर्धनासाठी समाजाने गांभीर्याने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये गोहत्या व गोवंश संरक्षणाबाबत वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे आहेत. संपूर्ण देशासाठी एकसमान व प्रभावी गोवंश हत्या बंदी कायदा व्हावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देऊन तिच्या संरक्षणासाठी व्यापक राष्ट्रीय धोरणाची गरज असल्याचे महाराजांनी प्रतिपादन केले.

गोमातेचे भारतीय संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगताना महाराजांनी दूध हे पोषक व अमृततुल्य मानले जाते, तसेच पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या पंचगव्य, गोमूत्र व गोमयाच्या विविध उपयोगांकडे लक्ष वेधले. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोमयाच्या सेंद्रिय वापरामुळे जमिनीची सुपीकता व पोत सुधारण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. गोमूत्र व गोमयाचा शेती तसेच पारंपरिक जीवनपद्धतीतील उपयोग वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले.
गोमाता ही भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेचे महत्त्वपूर्ण प्रतीक असून तिच्या संरक्षणासाठी केवळ कायदा नव्हे तर समाजामध्ये जनजागृती, गोसंवर्धन आणि गोसेवेची भावना निर्माण होणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सभेदरम्यान “गोहत्या बंद करा”, “गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा”, “गोमातेचे संरक्षण करा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन शांततामय व लोकशाही मार्गाने गोमाता संरक्षणासाठी जनजागृती करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती
सभेला नागरिक, गोप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, गोरक्षक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमास काली माता मंदिराचे महंत खुशालचंद महाराज तसेच खटकाळी हनुमान मंदिराचे महंत भगवान महाराज मोहन महाराज येडशी उमेश महाराज विनयदास महाराज बब्बुसेठ देशमुख गजाननराव घुगे बद्रीनारायण सारडा विट्ठलदास मूंदडा शिवाजीमहाराज गडदे राजु देशमुख किरण इंगोले सीमा हवालदार धाबे मधुसूदन मूंदडा रमेश सोनी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आयोजनासाठी विशेष प्रयत्न
या भव्य सभेच्या यशस्वी आयोजनासाठी ज्योती वर्मा, प्रकाश सोनी, राजेंद्र हलवाई, गजानन ठाकूर, धडवाई गुरुजी, अँड. ईश्वर प्रजापती, अनिल खांडल आशीष काबरा ओम सारडा यांच्यासह हिंगोलीतील सर्व गोरक्षक, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेंद्र साहू सर यांनी केले, तर उपस्थित मान्यवर, नागरिक, गोप्रेमी, गोरक्षक, कार्यकर्ते व स्वयंसेवकांचे आभार अँड. ईश्वर प्रजापती यांनी मानले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून गोमाता संरक्षण, गोसंवर्धन, भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि देशभर गोवंश संरक्षणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.
“गोमाता वाचवा — संस्कृती वाचवा!”
“गोमातेचा सन्मान — राष्ट्राचा अभिमान!”
“गोहत्या बंद करा — गोमातेला राष्ट्रमाता घोषित करा!” यावेळी उपस्थितांनी या घोषणा दिल्या.