गिरगाव वन विभाग

गिरगावात वानरांची धरपकड, साठ वानर वन विभागाच्या जाळ्यात

Girgaon Forest Department: वसमत तालुक्यातील गिरगाव येथे वनविभागाच्या पथकाने धरपकड मोहीम राबवली बुधवारी गिरगाव येथे सापळे लावून 60 वानर पकडण्यात यश मिळवले गावात वानराचा त्रास वाढल्या बद्दल...

गिरगावात वानरांची धरपकड, साठ वानर वन विभागाच्या जाळ्यात

Girgaon Forest Department

 

देशोन्नतीच्या बातमीची दखल

वसमत (Girgaon Forest Department) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे वनविभागाच्या पथकाने धरपकड मोहीम राबवली बुधवारी गिरगाव येथे सापळे लावून 60 वानर पकडण्यात यश मिळवले गावात वानराचा त्रास वाढल्या बद्दल गिरगाव सरपंच,ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरिकांनी वनविभागाला पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. गिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वानरांचा धुमाकूळ वाढल्या संदर्भात देशोन्नतीने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर (Girgaon Forest Department) वनविभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे वानरांची संख्या प्रचंड वाढली वानराच्या त्रासाने ग्रामस्थ शेतकरी त्रस्त झाली आहेत व गिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दसऱ्याच्या दिवशी वानरांचा धुमाकूळ सुरू होता वानरांच्या भीतीपोटी रुग्णांना दरवाजे लावून आत बसण्याची वेळ आली होती. विशेष म्हणजे दवाखान्यात एकच महिला कर्मचारी हजर होत्या इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कोठे होते हे समजू शकले नव्हते. या संदर्भातील सविस्तर वृत्त देशोन्नतीने 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले होते.
 
गिरगावात वानरांचा त्रास व संख्या वाढलेली आहे त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करणारे पत्र गिरगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून (Girgaon Forest Department) वन विभागाकडे देण्यात आले होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सुद्धा वन विभागाला पत्र लिहिण्यात आले होते. गावातील नागरिकांनीही वानराचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर वन विभागाने 28 ऑक्टोबर रोजी धरपकड मोहीम राबवली.
 
बुधवारी गिरगाव येथील जिल्हा परिषद शाळा परिसर व इतर ठिकाणी सापळे लावून साठ वानर 60 ते 70 वानर पकडण्यातआल्याचा दावा करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात वानर पकडून नेल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. या पथकामध्ये वनपाल अमोल झिकरवाड ,वनरक्षक जीआर श्रीरामे ,गोविंदराव नाईकवाडे ,गोटमवाड यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी गिरगाव येथील पदाधिकारी कर्मचारी ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.

अभयारण्यात वानर सोडल्याचा दावा
गिरगाव येथे बुधवारी (Girgaon Forest Department) वन विभागाच्या पथकाने वानरांची घरपकड राबवली 60 ते 70 वानर या मोहिमेत पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पकडलेले वानर वाहनाद्वारे यवतमाळ येथील अभयारण्यात नेऊन सोडण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
गिरगाव येथे वानराची धर पकड मोहीम राबवण्यात आल्याने  प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण शेतकरी व ग्रामस्थ यांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी होईल यात शंका नाही. मात्र या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांची गैरहजेरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडून कर्मचारी गैरहजर राहणे नांदेड व इतर ठिकाणाहून अपडाऊन करणारे कर्मचारी हा प्रकार आहे समोर आला आहे.या प्रकार संदर्भात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चौकशी करण्याची गरज आहे.दसऱ्याच्या दिवशी गिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक परिचारिका कर्मचारी हजर होत्या त्या व्यतिरिक्त इतर कर्मचारी डॉक्टर मंडळी कोठे होते याची ही चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे.