Girgaon Police Dial 112: गिरगाव तालुक्यातील पियुष वाघमारे यांनी ११२ क्रमांकावर खोटी माहिती सांदा घेतली, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची निष्प्रयोग झाली.
डायल ११२ क्रमांकाच्या वाहनाचा दुरूपयोग भोवला
हिंगोली (Girgaon Police Dial 112) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे एका व्यक्तीने माझ्या सासुच्या खुन झाला असल्याने तात्काळ पोलिसांची मदत मिळावी, या संदर्भात डायल ११२ क्रमांकावर संपर्क साधला. काही वेळातच डायल ११२ क्रमांकाचे वाहन घटनास्थळी पोचले परंतु ही खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने कुरूंदा पोलिसात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला.
या बाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील गिरगाव येथील पियुष वाघमारे याने २५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कुरूंदा पोलिस ठाण्याच्या डायल ११२ क्रमांकावर संपर्क साधून माझ्या सासुचा खुन झाला आहे. तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. खुनासारखी गंभीर घटना समजल्यानंतर पोलिसांचे डायल ११२ हे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहचले. यावेळी जमादार राजीव जाधव यांच्यासह कर्मचार्यांनी पियुष वाघमारे यांच्या पाहणी केली असता खुनासारखी कोणतीही घटना त्यांच्या निर्दशनास आली नाही.
अधिकची माहिती घेतल्यानंतर वाघमारे यांची सासु गावात राहत नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर गावातील पोलिस पाटलासह इतरांना पोलिसांनी घटनास्थळी बोलावून घेतल्यानंतर पंचनामा केला. सदर प्रकरणात राजीव जाधव यांनी २६ ऑगस्ट रोजी कुरूंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पियुष वाघमारे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मन्मथ नरडीले हे करीत आहेत.