घोट अवैध रेती उत्खनन

घोट परिसरात अवैध रेती उत्खननावर एफडीसीएमची कारवाई; ट्रॅक्टर जप्त

Ghot illegal sand mining : घोट परिसरात अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) पथकाने कारवाई केली.

घोट परिसरात अवैध रेती उत्खननावर एफडीसीएमची कारवाई; ट्रॅक्टर जप्त

Ghot illegal sand mining

घोट (Ghot illegal sand mining) : घोट परिसरात अवैधरित्या रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वन विकास महामंडळाच्या (एफडीसीएम) पथकाने कारवाई केली. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजता कक्ष क्रमांक ५२८ मधील चाची नाल्याजवळ गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांना रेतीने भरलेले ट्रॅक्टर आढळून आले. आवश्यक परवाना नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.

या (Ghot illegal sand mining) प्रकरणात ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३३/एओ-८४२१ असून, वाहनमालक किशोर चंडी कुंडू, रा. नरेंद्रपूर यांच्याविरुद्ध वनगुन्हा क्रमांक ४३३०७७-२०२६/२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर मुलचेरा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आले आहे. ही कारवाई वन विकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौरभ गंजेवार, वनपरिमंडळ अधिकारी आर. पी. आगोसे, तसेच ठाकूरनगर-घोट येथील वनरक्षक वाय. बी. येलेकर, एस. एस. लेकामी व राठोड यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास वनविभागाकडून सुरू आहे.

दरम्यान, घोट-मुलचेरा परिसरात अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी नियमित गस्त आणि कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. एफडीसीएमच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.